आयपीएल संपल्यानंतर भारताचा संघ लगेचच आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी यूएईतुनच रवाना होणार आहे. मात्र या संपूर्ण कालावधीत खळाडूंना कोरोनाच्या प्रादुर्भावा पासून वाचण्यासाठी बायो बबलमध्येच रहावे लागणार आहे. या बायो बबलमध्ये राहणे सोपे नसून दौरा कमी असावा, असे मत भारताचा कर्णधार विराट कोहली व्यक्त करतोय.
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा 27 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. तर या दौऱ्याचा शेवटचा 19 जानेवारीला होईल. या दौऱ्यासाठी भारताचा संघ आयपीएल संपताच 12 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाकडे रवाना होणार असून 14 दिवस ऑस्ट्रेलियात क्वारंटाइन राहणार आहे. त्यानंतर सामन्यांना सुरुवात केली जाणार आहे. तब्बल 2 महिने व 1 आठवडा भारताचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असणार आहे. या दरम्यान भारताच्या संघाला बायो बबलमध्ये रहावे लागणार आहे. बायो बबलमध्ये राहणे त्रासदायक असल्याचे भारताचा कर्णधार विराट कोहली म्हणत आहे.
बायो बबल म्हणजे नक्की काय ?
यूएईमध्ये सुरू असलेल्या आयपीएलमध्ये देखील खेळाडू कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी बायो बबलमध्ये राहत आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये देखील त्यांना असेच राहावे लागणार आहे. यामध्ये खेळाडूंना मैदान व हॉटेल सोडून इतर कुठेही जाण्याची परवानगी दिली जात नाही. बायो बबलमध्ये असलेल्या लोकांव्यतिरिक्त बाहेरील कोणत्याही व्यक्तीस भेटण्याची मुभा खेळाडूंना दिली जात नाही. आयपीएल हंगामात खेळाडू संपूर्ण 3 महिने बायो बबलमध्ये राहत आहेत.
बायो बबलबद्दल विराट कोहलीने व्यक्त केली चिंता
आयपीएल संपल्यानंतर ऑस्ट्रेलिया दौरा हा दोन महिन्यांपेक्षा मोठा आहे. यादरम्यान बायो बबलमध्ये असल्याने परिवारापासून दूर रहावे लागणार आहे. यामुळे खेळाडूंच्या मानसिकतेवर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता भारताचा कर्णधार विराट कोहलीने आरसीबी टीव्हीशी बोलताना व्यक्त केली.
इतके दिवस तुम्ही सातत्याने एकच गोष्ट करीत असता. तुम्हाला इतर काही गोष्टी करता येत नाही. कुटुंबातील सदस्यांना भेटण्याची देखील संधी दिली जात नाही. त्यामुळे दौरे हे फार मोठे नसावेत असे कोहलीने म्हटले आहे. परंतु बीसीसीआयने खेळाडूंच्या कुटुंबियांना दौऱ्यावर जाण्याची मुभा असल्याचे सांगितले आहे. मात्र त्यांनाही बायो बबलमध्येच रहावे लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
दिल्लीविरुद्ध दुखापतग्रस्त झालेला बोल्ट फायनलमध्ये खेळणार का? पाहा काय म्हणाला रोहित शर्मा
कोहलीच्या संघासाठी कदाचीत रोहित फिट नसेल, माजी कर्णधाराचे मोठे वक्तव्य