---Advertisement---

दिल्लीविरुद्ध दुखापतग्रस्त झालेला बोल्ट फायनलमध्ये खेळणार का? पाहा काय म्हणाला रोहित शर्मा

On: शुक्रवार, नोव्हेंबर 6, 2020 2:29 PM
---Advertisement---

मुंबई इंडियन्स संघाने गुरुवारी(5 नोव्हेंबर) ‘क्वालिफायर 1’ च्या पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपीटल्सला 57 धावांनी पराभूत केले. या विजयासह मुंबईचा संघ थेट अंतिम सामन्यात पोहोचला आहे. परंतु, या सामन्यात दुखापती मुळे ट्रेंट बोल्टने फक्त 2 षटके फेकली होती. त्यामुळे अंतिम सामन्यात त्याच्या खेळण्याबद्दल प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पण गुरुवारचा सामना संपल्यानंतर रोहितने बोल्टच्या दुखापतीबद्दल महत्त्वाचं व्यक्तव्य केले आहे.

ट्रेंट बोल्टच्या दुखापतीबद्दल बोलला रोहित शर्मा

मुंबईचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट सामन्यादरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. अंतिम सामन्यापूर्वी असे होणे मुंबईसाठी धक्कादायक ठरू शकते. यावर रोहित शर्मा सामन्यानंतर म्हणाला की, “मी अजून ट्रेंट बोल्टला भेटलो नाही. परंतु माझ्या मते इतकी मोठी समस्या नसावी, तो ठीक वाटत आहे. अंतिम सामन्यापूर्वी तीन दिवसांच्या विश्रांतीमध्येच तो पूर्ण ठीक होईल. बुमराह आणि बोल्ट आमच्या गोलंदाजीचा सर्वात मजबूत भाग आहेत. दोघेही वेगवेगळ्या देशासाठी खेळतात म्हणून दोघांची वेगवेगळी रणनिती आहे आणि आता एकसंघ म्हणून आमच्या वेगळ्या असून आम्ही त्या एकत्रपणे मैदानात राबवतो.”

या सामन्यात नाणेफेक गमावून फलंदाजी करण्यास उतरलेल्या मुंबईने 200 धावा उभ्या केल्या. मुंबईकडून क्विंटन डी कॉकने 40, सुर्यकुमार यादवने 51, ईशान किशन नाबाद 55 तर हार्दिक पांड्याने नाबाद 37 धावा केल्या होत्या. दिल्लीकडून अश्विनने 3 बळी घेतले होते.

201 धावांचा पाठलाग करताना दिल्लीचा संघ 143 पर्यंतच पोहोचू शकला होता. यात मार्कस स्टोयनीसने 65 तर अक्षर पटेलने 42 धावांची खेळी केली होती. दिल्लीच्या संघाला 150च्या आतच रोखण्यात मुंबईच्या गोलंदाजांचे मोठे योगदान होते. मुंबईकडून बोल्टने 2 तर बुमराहने 4 बळी घेतले होते. मुंबईने 57 धावांनी सामना जिंकून अंतिम सामन्यात धडक दिली.

अंतिम सामन्याबद्दल बोलला रोहित शर्मा

गुरुवारचा सामना संपल्यानंतर रोहित म्हणाला, “मला वाटतं की हे आमच्या संघाचं सर्वश्रेष्ठ प्रदर्शन होतं. मी लवकर बाद झाल्यानंतर डी कॉक व सुर्यकुमारने संघाचा मोर्चा सांभाळला होता. आम्हाला एक चांगला पॉवरप्ले अपेक्षित असतो आणि त्याच दृष्टीने आम्ही खेळत असतो. प्रथम फलंदाजी करत असताना आम्ही कसलेही लक्ष्य डोक्यात ठेवत नाही. परिस्थिती नुसार खेळ करण्यात आमचा संघ माहिर आहे आणि आमचा संघ वैविध्यपूर्ण संघ आहे.”

महत्त्वाच्या बातम्या –

कोहलीच्या संघासाठी कदाचीत रोहित अपेक्षेनुसार फिट नसेल, माजी कर्णधाराचे मोठे वक्तव्य

“क्या ऑस्ट्रेलिया जायेगा रे तू”, मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर पंतबरोबरच आता पाँटिंगही ट्रोल, पाहा मजेशीर मीम्स

धोनी आणि डू प्लेसिसची मस्ती; ‘या’ खेळाडूला केलं टार्गेट, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---