भारतीय क्रिकेटमध्ये अनेक यशस्वी सलामीवीर फलंदाज झाले, पण एक असा फलंदाज होता, ज्याने केवळ अनेक वर्ष सलामीची जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळली नाही तर सलामीच्या फलंदाजीची व्याख्याच बदलली. तो खेळाडू म्हणजे विरेंद्र सेहवाग.
भारताचा यशस्वी सलामीवीर विरेंद्र सेहवाग हा नेहमीच त्याच्या आक्रमक फलंदाजी बरोबरच त्याच्या हजरजबाबीपणासाठी ओळखला जातो. तो अनेकदा प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना जशास तसे उत्तर देतानाही दिसला आहे, पण त्यावेळेसही त्यात एक प्रकारचा विनोद करण्याचा प्रयत्नही तो करायचा. त्याचे याबाबतचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत, मग ते शोएब अख्तरला ‘बाप बाप होता है’ म्हणणे असो वा, षटकार मारण्यासाठी पाकिस्तानचा कर्णधार इंजमामला क्षेत्ररक्षणात बदल करण्यास सांगणे असो. सेहवाग हा त्याच्या फलंदाजी प्रमाणेच स्वभावानेही बिंधास्त होता.
सेहवाग बाबतचा असाच एक गमतीशीर किस्सा म्हणजे त्याने इंग्लंडचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू अँड्र्यू फ्लिंटॉफला सामन्यादरम्यानच सांगितले होते की ‘तू जर बाऊंसर मारला नाही तर तूला संध्याकाळी चांगली करी जिथे मिळते तिथे घेऊन जाईल. याबद्दलचा खूलासा खुद्द सेहवागनेच केला होता.
एका कार्यक्रमादरम्यान बोलताना सेहवाग म्हणाला होता, ‘उगीचच वाद घालण्यात काही अर्थ नसतो. मी जसे वेगवान गोलंदाजांशी वागतो, तसे वागत जा. मला एक गोष्ट कळाली होती की त्यांना (प्रतिस्पर्धी) स्लेजिंग करण्यात काही अर्थ नसतो. एकदा मुंबईत इंग्लंडविरुद्ध सामना होत होता. त्या सामन्यात अँड्र्यू फ्लिंटॉफ मला सारखा बाऊंसर टाकत होता. तेव्हा मी त्याला एक वचन दिले, जर त्याने मला बाऊंसर टाकला नाही, तर मी त्याला संध्याकाळी अशा ठिकाणी घेऊन जाईल जिथे चांगली करी मिळते; आणि माझी ही योजना यशस्वी झाली.’
सेहवाग हा असाच होता, जसा तो वादळी खेळ करुन प्रतिस्पर्धी संघाला नेस्तनाभूत करायचा, तसाच त्याच्या विनोदी बोलण्याने प्रतिस्पर्धी खेळाडूचे तोंडही बंद करायचा. त्याचमुळे त्याचे मैदानाबाहेर अन्य देशांच्या खेळाडूंशी चांगले संबंध राहिले, जे आजही कायम आहेत.
ट्रेंडिंग लेख –
केवळ एका वनडे सामन्यात संघाचे नेतृत्त्व करायला मिळालेले ३ भारतीय दिग्गज
अ दर्जाच्या क्रिकेटमधील ५ दिग्गज भारतीय खेळाडू, जे वनडे क्रिकेटमध्ये ठरलेत फ्लॉप
ब्युटी विथ ब्रेन! पहा नक्की कोण आहे भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहलची होणारी पत्नी
महत्त्वाच्या बातम्या –
पंजाबमधील नव्या स्टेडियमला देण्यात येणार ‘या’ माजी कसोटीपटूचे नाव
ब्रेट लीची भविष्यवाणी कुंबळेच्या मार्गदर्शनाखाली ‘हा’ संघ जिंकणार आयपीएलचे विजेतेपद
सचिन, गांगुली, सेहवाग नाही तर ‘या’ भारतीय फलंदाजाविरुद्ध गोलंदाजी करताना शोएब अख्तरला यायचे टेंशन