---Advertisement---

सीएसके संघाचा नवा उपकर्णधार कोण असेल? चाहत्य‍ाने केली विचारणा; फ्रेंचायझीचे आश्चर्यकारक उत्तर

On: शनिवार, सप्टेंबर 5, 2020 12:49 PM
---Advertisement---

मुंबई । माजी भारतीय फलंदाज सुरेश रैनाने यंदा आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.  रैना चेन्नई सुपर किंग्जचा उप-कर्णधार असून संघासह युएईमध्ये पोहोचला होता, पण त्यानंतर तो भारतात परतला. यावर्षी त्याने वैयक्तिक कारणांमुळे आयपीएलमधून माघार घेण्याचे ठरविले.

रैनाने आयपीएमधून माघार घेतल्यानंतर संघाचा उपकर्णधारची जागा रिक्त झाली आहे. अशा परिस्थितीत चाहत्यांनी सीएसकेला संघाचा नवा उप-कर्णधार कोण असेल? अशी विचारणा केली तेव्हा फ्रेंचायझीच्या उत्तरामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटले.

एका चाहत्याने आपल्या ट्विटरच्या माध्यमातून सीएसकेला टॅग केले आणि विचारले की आता उपकर्णधार कोण असेल?  सीएसकेने त्या ट्विटला रंजक पद्धतीने प्रत्युत्तर दिले. सीएसकेने लिहिले की, ‘व्हाइस कॅप्टन इरुक्के बायम येन?’  याचा अर्थ असा की, जेव्हा संघाचा चतुर कर्णधार उपस्थित असेल तेव्हा आपण घाबरत का आहात?

आयपीएलमध्ये एमएस धोनी कर्णधार असलेला चेन्नई सुपर किंग्स संघ यशस्वी संघ आहे. धोनीला क्रिकेटमधील एक उत्तम कर्णधारही मानले जाते. तसेच सीएसके संघाच्या यशात धोनी आणि रैनाचा मोठा वाटा आहे. या दोन्ही खेळाडूंनी आपल्या संघाला तीन वेळा आयपीएलचा विजेता बनविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

रैनाच्या अनुपस्थितीत संघाचा उपकर्णधार म्हणून रवींद्र जडेजाला जबाबदारी दिली जाऊ शकते. तो एक अनुभवी खेळाडू आहे आणि बर्‍याच काळापासून चेन्नई सुपर किंग्जसंघाकडून खेळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

डेव्हिड वॉर्नरच्या स्फोटक खेळीनंतरही ऑस्ट्रेलिया पराभूत; इंग्लंडची मालिकेत आघाडी

दोन आयपीएल संघ करणार होते त्याला आपल्या ताफ्यात सामील, परंतू बोर्डाने घातला खोडा

बीसीसीआयने माजी दिग्गज खेळाडूला दिला धक्का; आयपीएलच्या कॉमेंट्री पॅनेलमध्ये दिले नाही स्थान

ट्रेंडिंग लेख –

बडेमियाँ-छोटेमियाँ! आयपीएलमध्ये खेळलेल्या ३ भारतीय भावांच्या जोड्या

आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार मिळवलेले ३ खेळाडू; एकाही भारतीयाचा मात्र समावेश नाही

आयपीएल २०२० : या ४ दिग्गज खेळाडूंना क्वचितच मिळू शकेल खेळण्याची संधी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---