भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शुक्रवारी(७ मे) जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी आणि इंग्लंडविरुद्ध ऑगस्ट-सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी २० जणांच्या भारतीय संघाची घोषणा केली आहे.
इंग्लंडविरुद्ध मायदेशात फेब्रुवारी-मार्च मध्ये झालेल्या कसोटी मालिकेत खेळलेले बहुतेक खेळाडू इंग्लंड दौऱ्यासाठीही कायम आहेत. यात अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, आर अश्विन, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, रोहित शर्मा, इशांत शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल अशा खेळाडूंचा समावेश आहे. तसेच या संघात रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह यांचे पुनरागमन झाले आहे.
भारताला १८ ते २२ जून दरम्यान साऊथँम्पटन येथे कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना न्यूझीलंड विरुद्ध खेळायचा आहे. त्यानंतर भारताला ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका इंग्लंडमध्ये खेळायची आहे. या कसोटी मालिका ४ ऑगस्टपासून सुरु होणार असून १४ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.
त्यामुळे या संपूर्ण इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. या संघात मागील काही दिवसात आपल्या फलंदाजीने छाप पाडणाऱ्या पृथ्वी शॉला संधी देण्यात आलेली नाही. तसेच हार्दिक पंड्यालाही वगळण्यात आले आहे. याबरोबरच या संघात केएल राहुल आणि वृद्धिमान साहाला संधी देण्यात आली आहे, मात्र त्यांचा समावेश हा त्यांच्या फिटनेस लक्षात घेऊनच केला जाईल.
केएल राहुलची नुकतीच अपेंडिक्सचा त्रास होत असल्याने शस्त्रक्रिया झाली आहे. तर साहा कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. याव्यतिरिक्त सर्वाधिक चर्चा असणाऱ्या प्रसिद्ध कृष्णाला २० जणांच्या संघात संधी मिळाली नसली तरी त्याला राखीव खेळाडूंमध्ये मात्र स्थान मिळाले आहे.
असा आहे इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ –
विराट कोहली(कर्णधार), अजिंक्य रहाणे(उपकर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, केएल राहुल (फिटनेसवर अवलंबून), वृद्धिमान साहा (फिटनेसवर अवलंबून).
राखीव खेळाडू – अभिमन्यू इश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्झान नाग्वास्वाल्ला
India's squad: Virat Kohli (C), Ajinkya Rahane (VC), Rohit Sharma, Gill, Mayank, Cheteshwar Pujara, H. Vihari, Rishabh (WK), R. Ashwin, R. Jadeja, Axar Patel, Washington Sundar, Bumrah, Ishant, Shami, Siraj, Shardul, Umesh.
KL Rahul & Saha (WK) subject to fitness clearance.
— BCCI (@BCCI) May 7, 2021
भारताचा इंग्लंड दौरा
१८ ते २२ जून – कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना (भारत विरुद्ध न्यूझीलंड), साऊथँम्पटन
कसोटी मालिका – इंग्लंड विरुद्ध भारत
४-८ ऑगस्ट – पहिला कसोटी सामना, नॉटिंगघम
१२-१६ ऑगस्ट – दुसरा कसोटी सामना, लॉर्ड्स
२५-२९ ऑगस्ट – तिसरा कसोटी सामना, हेडिंग्ले
२-६ सप्टेंबर – चौथा कसोटी सामना, लंडन
१०-१४ सप्टेंबर – पाचवा कसोटी सामना, मँटेस्टर
महत्त्वाच्या बातम्या –
व्वा! मास्क खरेदी करु न शकणाऱ्या गरजूंच्या मदतीसाठी आर अश्विन आला पुढे; दिले हे आश्वासन
व्वा! मास्क खरेदी करु न शकणाऱ्या गरजूंच्या मदतीसाठी आर अश्विन आला पुढे; दिले हे आश्वासन