आज भारताचा माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथचा 53 वा वाढदिवस. जवागल श्रीनाथचा जन्म ३१ ऑगस्ट १९६९ रोजी म्हैसुर, कर्नाटक येथे झाला.
९०च्या दशकात या खेळाडूने भारतीय गोलंदाजीची धुरा समर्थपणे वाहिली. त्याने भारताकडून खेळलेल्या ६७ कसोटीत २३६ विकेट्स आणि २२९ वनडेत ३१५ विकेट्स मिळवल्या आहेत.
अशा या भारताच्या महान गोलंदाजाबद्दल माहित नसलेल्या काही मनोरंजक गोष्टी
१. श्रीनाथने हैद्राबाद संघाविरुद्ध १९८९ रोजी पदार्पणाच्या रणजी सामन्यातच पहिल्याच डावात हॅट्रिक घेतली होती. तसेच त्याने ८५ धावा देत या डावात ५ विकेट्स घेतल्या तर सामन्यात ७ विकेट्स घेत पदार्पण गाजविले.
२. भारताकडून वनडेत सर्वाधिक विकेट घेणारा तो दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे. त्याने वनडेत २२९ सामन्यात ३१५ विकेट्स घेतल्या आहे तर कुंबळेने वनडेत ३३४ विकेट्स घेतल्या आहेत. वनडेत ३०० विकेट्स घेणारा तो केवळ दुसरा भारतीय खेळाडू आहे.
🔹 6⃣7⃣ Tests and 2⃣2⃣9⃣ ODIs
🔹 5⃣5⃣1⃣ international wickets
🔹 Only #TeamIndia 🇮🇳 fast bowler to take over 300 ODI wickets
🔹 One of the finest pacers and now a match refereeHere’s wishing Javagal Srinath a very happy birthday. 👏🎂 pic.twitter.com/DzDOAg785D
— BCCI (@BCCI) August 31, 2020
३. श्रीनाथला मितभाषी आणि शांत स्वभावाचा खेळाडू म्हणुन ओळखले जायचे. तो कधीही कुणाला गोलंदाजी करताना खुन्नस देत नसे. वेलिंग्टन कसोटीत जेव्हा त्याने टाकलेला एक उसळता चेंडू स्टिफन फ्लेमिंगच्या हेल्मेटला लागला तेव्हा श्रीनाथ स्लेजिंग करत असल्याचे फ्लेमिंगला वाटले. त्यामुळे तो श्रीनाथ जवळ जाऊन हुज्जत घालायला लागल्यावर श्रीनाथने त्याला सांगितले की ‘मी तू ठीक आहे की नाही’ हे विचारत होतो. हे दोन्हीही खेळाडू पुढे जागतिक क्रिकेटमध्ये एक आदर्श खेळाडू म्हणुन ओळखले गेले.
४. श्रीनाथने १९९९मध्ये पहिला विवाह केला परंतु पहिल्या लग्नानंतर काही वर्षांनी दोघांच्या संमतीने घटस्फोट घेतला. नंतर २००७मध्ये तो पत्रकार माधवी पत्रावलींबरोबर विवाहबंधनात अडकला.
Happy Birthday to @BCCi's leading pace bowler of the 1990s, Javagal Srinath pic.twitter.com/Yh1iWg13Da
— ICC (@ICC) August 31, 2015
५. केवळ श्रीनाथमुळे अनिल कुंबळे कसोटी डावात १० विकेट्स घेऊ शकला. झाले असे की पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात फिरोजशाह सुरु असलेल्या सामन्यात कुंबळेने ९ विकेट्स घेतल्या होत्या. त्याला १० विकेट्सचा टप्पा पार करण्यासाठी केवळ १ विकेटची गरज होती. अशा वेळी जवागल श्रीनाथ दुसऱ्या बाजून गोलंदाजी करत होता. यावेळी ऑफ स्टंपच्या बाहेर मारा करत श्रीनाथने विकेट घेणे टाळले होते. नाहीतर कदाचीत हा विक्रम कधीच भारतीय खेळाडूच्या नावावर झाला नसता.
६. १९९१ला भारतीय संघात पदार्पण केलेल्या श्रीनाथने १९९२साली वर्षातील सर्वात्तम भारतीय क्रिकेटरचा पुरस्कार मिळवला होता.
७. क्रीडा क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठेचा समजल्या जाणाऱ्या अर्जून पुरस्काराने १९९६मध्ये श्रीनाथला सन्मानित करण्यात आले.
८. २००३मध्ये शेवटचा सामना खेळलेल्या श्रीनाथने २००६मध्ये पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये काम करायला सुरुवात केली परंतु यावेळी जबाबदारी वेगळी होती. यावेळी त्याने आयसीसी सामनाधिकारी म्हणुन काम पाहण्यास सुरुवात केली. त्याने तब्बल ३४२ सामन्यात सामनाधिकारी म्हणुन काम पाहिले आहे. आजपर्यंत केवळ ७ भारतीयांनी ही जबाबदारी पार पाडली आहे.
Your annual look at one of the greatest ODI deliveries ever!
Happy birthday Javagal Srinath :tada: pic.twitter.com/AmFfV8UdJH— cricket.com.au (@cricketcomau) August 31, 2020
९. श्रीनाथने म्हैसुरच्या एका महाविद्यालयातून इंजिनीयरिंगचे शिक्षण पुर्ण केले आहे.
१०. श्रीनाथला क्रिकेट जगतात म्हैसुर एक्सप्रेस म्हणुन ओळखले जाते.
११. श्रीनाथने २००२साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली परंतु तेव्हाच कर्णधार असलेल्या गांगुलीने त्याला २००३चा विश्वचषक खेळण्याची विनंती केली.
वाचा –
गोष्ट एका क्रिकेटरची भाग ९: म्हैसुर एक्सप्रेस जवागल श्रीनाथ
….आणि एवढा महान क्रिकेटर श्रीनाथ सचिनची पँट घालूनच उतरला मैदानात