---Advertisement---

भारतातच होणार २०२१चा टी२० विश्वचषक तर २०२२मध्ये होणार…

---Advertisement---

२० जुलैला आयसीसीने यावर्षी ऑस्ट्रेलियात होणारी टी२० विश्वचषक स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. जगभरात हाहाकार माजवलेल्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला होता. याबरोबरच आयसीसीने ३ मुख्य स्पर्धांसाठीचे कालावधीही निश्चित केले होते. यात २०२१ आणि २०२२ ला होणाऱ्या २ टी२० विश्वचषक आणि भारतात होणाऱ्या २०२३ च्या वनडे विश्वचषकाचा समावेश होता.

परंतु त्यावेळी आयसीसीने टी२० विश्वचषकांच्या यजमानपदाबद्दल खुलासा केला नव्हता. मात्र आता आधीच ठरल्याप्रमाणे भारत २०२१ ला होणाऱ्या टी२० विश्वचषकाचे यजमानपद भुषवेल. तर २०२२ ला ऑस्ट्रेलिया टी२० विश्वचषकाचे यजमानपद सांभाळेल हे निश्चित झाले आहे. याबद्दलचा निर्णय शुक्रवारी आयसीसीच्या बैठकीदरम्यान घेण्यात आला आहे.

बीसीसीआय आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाने टी२० विश्वचषकांविषयी चर्चा केली आणि पुढच्या स्पर्धेचे यजमानपद भारताला देण्यास त्यांनी परस्पर सहमती दर्शविली आहे.

२०२१ टी२० विश्वचषक २०२० च्या स्वरुपानुसार होईल. म्हणजेच २०२० ला जो टी२० विश्वचषक होणार होता, त्या विश्वचषकासाठी पात्र ठरलेले सर्व संघ २०२१ च्या टी२० विश्वचषकात खेळतील. तर २०२२ टी२० विश्वचषकासाठी नवीन पात्रता प्रकिया चालविली जाईल.

याबरोबरच पुढीलवर्षी फेब्रुवारीला न्यूझीलंडमध्ये होणारा महिला वनडे विश्वचषकही पुढे ढकलला आहे. हा विश्वचषक आता २०२२ ला होईल.

हा विश्वचषक न्यूझीलंड येथे पुढीलवर्षी ६ फेब्रुवारी ते ७ मार्च दरम्यान होणार होता. या स्पर्धेत ८ संघ सहभागी होणार आहेत. त्यात गतविजेते इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, यजमान न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा समावेश आहे. अन्य ३ संघ अजून या स्पर्धेसाठी पात्र ठरायचे आहेत. पण आता हा विश्वचषक २०२२ ला होईल. तर या विश्वचषकासाठी यावर्षी होणारी पात्रता फेरी स्पर्धा पुढीलवर्षी होईल.

आयसीसीच्या पुढील स्पर्धा –

२०२१ – टी२० विश्वचषक – यजमान – भारत

२०२२ – टी२० विश्वचषक – यजमान – ऑस्ट्रेलिया

२०२२ – महिला वनडे विश्वचषक – यजमान – न्यूझीलंड

२०२३ – वनडे विश्वचषक – यजमान – भारत

महत्त्वाच्या बातम्या – 

हा माजी दिग्गज खेळाडू झाला कोरोना संक्रमित? इंस्टाग्रामवर केला खुलासा

भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान होणारा बॉक्सिंग डे कसोटी सामना मेलबर्न ऐवजी होणार या स्टेडियममध्ये?

युवराज सिंग म्हणतो, गांगुली निवृत्त झाल्यावर मला संधी मिळाली, पण…

ट्रेंडिंग लेख – 

क्रिकेट जगतातील ५ महान खेळाडू, जे झाले होते वाॅटरबाॅय

फलंदाजांच्या कानाजवळून शिट्टीचा आवाज काढत जाणारे चेंडू टाकण्यासाठी कुप्रसिद्ध ठरलेला गोलंदाज

या क्रिकेटरला पुढचा इयान बाॅथम असं म्हटलं जायचं, पण वैयक्तिक संकटांमुळे…

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---