सिडनी। ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर सुरु असलेल्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताकडून शुबमन गिल आणि रोहित शर्माने सलामीला फलंदाजी केली. त्यांनी भारताला चांगली सुरुवात करुन देताना अर्धशतकी भागीदारीही केली. यादरम्यान रोहितने एक खास विक्रम केला आहे.
रोहितने भारताच्या डावाच्या १६ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर नॅथन लायनविरुद्ध एक खणखणीत षटकार ठोकला. यासह त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० षटकार पूर्ण केले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध १०० षटकार मारणारा तो पहिला आणि सध्या एकमेव क्रिकेटपटू ठरला आहे. त्याच्याआधी कोणालाही असा पराक्रम करता आला नव्हता.
रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मारलेल्या १०० षटकारांपैकी ९ षटकार त्याने कसोटीत मारले आहेत. तसेच वनडेत त्याने ७६ षटकार आणि टी२०मध्ये १५ षटकार मारले आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक षटकार मारणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये रोहितच्या पाठोपाठ ओएन मॉर्गन आहे. त्याने ६३ षटकार मारले आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे क्रिकेटपटू –
१०० – रोहित शर्मा
६३ – ओएन मॉर्गन
६१ – ब्रेंडन मॅक्यूलम
६० – सचिन तेंडुलकर
६० – एमएस धोनी
एकाच संघाविरुद्ध १०० किंवा अधिक षटकार मारणारे खेळाडू –
एकाच संघाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० किंवा अधिक षटकार मारणारा रोहित हा दुसरा खेळाडू आहे. त्याच्याआधी हा विक्रम ख्रिस गेलने केला आहे. गेलने इंग्लंडविरुद्ध १३० षटकार मारले आहेत. तसेच गेलने न्यूझीलंडविरुद्ध देखील ८७ षटकार मारले आहेत. याबरोबरच रोहितने ऑस्ट्रेलिया पाठोपाठ वेस्ट इंडिज विरुद्ध ७० षटकार ठोकले आहेत.
एकाच संघाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे क्रिकेटपटू –
१३० षटकार – ख्रिस गेल विरुद्ध इंग्लंड
१०० षटकार – रोहित शर्मा विरुद्ध ऑस्ट्रेलिया
८७ षटकार – ख्रिस गेल विरुद्ध न्यूझीलंड
८६ षटकार – शाहिद आफ्रिदी विरुद्ध श्रीलंका
७८ षटकार – ब्रेंडन मॅक्यूलम विरुद्ध इंग्लंड
७६ षटकार – ग्लेन मॅक्सवेल विरुद्ध भारत
७५ षटकार – शाहिद आफ्रिदी विरुद्ध भारत
७१ षटकार – विवियन रिचर्ड्स विरुद्ध इंग्लंड
७१ षटकार – सनथ जयसुर्या विरुद्ध पाकिस्तान
७० षटकार – रोहित शर्मा विरुद्ध वेस्ट इंडिज
International six No.424 for Rohit Sharma!
Live #AUSvIND: https://t.co/xdDaedY10F pic.twitter.com/nypB41kYvB
— cricket.com.au (@cricketcomau) January 8, 2021
रोहित सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय –
रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ४२४ षटकार ठोकले आहेत. तो भारताचा सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू आहे. त्याच्या पाठोपाठ एमएस धोनी असून त्याने ३५९ षटकार मारले आहेत.
रोहित मोठी खेळी करण्यात अपयशी –
सध्या सुरु असलेल्या सिडनी कसोटीत रोहितने जरी ऑस्ट्रेलियाविरुद्ध १०० वा षटकार मारत विक्रम केला असला, तरी मात्र तो पहिल्या डावात मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला आहे. तो ७७ चेंडूत २६ धावा करुन जॉस हेजलवूडच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याचा झेल हेजलवूडनेच घेतला. असे असले तरी त्याने गिलसह ७० धावांची भागीदारी रचली. गिल ५० धावा करुन बाद झाला. भारताने दुसऱ्या दिवसाखेर २ बाद ९६ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
जड्डूच्या बुलेट थ्रोने स्मिथच्या शतकी खेळीचा अंत, व्हिडिओ पाहून कराल कौतुक
चालू सामन्यात लॅब्यूशानेचा शुबमन आणि रोहितला डिवचण्याचा प्रयत्न, एकदा व्हिडिओ पाहाच
व्हिडिओ : जडेजाच्या फिरकीत फसला लॅब्यूशाने, रहाणेने टिपला लाजवाब झेल