मुंबई । भारताने आजच्याच दिवशी नऊ वर्षांपूर्वी म्हणजेच 23 जून 2013 साली इंग्लंडला हरवून चॅम्पियन्स ट्रॉफीवर मोहोर लावली होती. यावेळी एमएस धोनी भारतीय संघाचे नेतृत्व करत होता. 2013 साली झालेली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून धोनीने एक जागतिक विक्रम आपल्या नावावर केला. धोनीने क्रिकेटमधे असा कारनामा केला आहे की, जो आतापर्यंत जगातल्या कुठल्याच कर्णधाराला करता आला नाही.
https://twitter.com/ICC/status/1142756693685805062
धोनीने आपल्या नेतृत्वाखाली 2007 सालीचा टी 20 विश्वचषक, 2011 सालीचा वनडे विश्वचषक आणि 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी अशा आयसीसीच्या तीन स्पर्धा भारतीय संघाला जिंकून दिल्या आहेत. धोनी व्यतिरिक्त आतापर्यंत आयसीसीच्या तीन विविध ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी कोणत्याच कर्णधाराला करता आली नाही.
https://twitter.com/ICC/status/775891885919391744
2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील अंतिम सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात बर्मिंघम येथे खेळवण्यात आला होता. अंतिम सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्याने हा वनडे सामना 20-20 षटकांचा खेळवण्यात आला. अत्यंत रोमांचक झालेल्या या सामन्यात विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी दमदार कामगिरी केली.
https://twitter.com/cricketworldcup/status/816670928910290947
इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी करण्यास आमंत्रित केले. शिखर धवनने 24 चेंडूत 31, विराट कोहलीने 34 चेंडूत 41 आणि रवींद्र जडेजाने 25 चेंडूत 33 धावांची खेळी साकारली. भारताने निर्धारित 20 षटकांत 7 बाद 129 धावा केल्या.
भारताने दिलेले छोट्या धावांचे आव्हान इंग्लंड सहज पार करेल असे अनेकांना वाटू लागले होते. पण कर्णधार एमएस धोनीचे चाणाक्ष नेतृत्व आणि रवींद्र जडेजा, आर अश्विन यांच्या फिरकी गोलंदाजीपुढे इंग्लंडच्या फलंदाजांनी लोटांगण घातले. शेवटच्या षटकात भारताने पाच धावांनी विजय मिळवला. या सामन्यात रवींद्र जडेजाला सामनावीर तर सलामीचा फलंदाज शिखर धवन याला मालिकावीरचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
ट्रेंडिंग घडामोडी –
‘१० ओव्हर्स अन् ६ विकेट्स’ क्रिकेटचे नियम बदलले!, वाचा सविस्तर
‘कोहलीचा खराब फॉर्म रवि शास्त्रींमुळेच!’, पाकिस्तानच्या माजी दिग्गजाचा विचित्र दावा
रॉयची नाद खुळा बॅटींग, बटलरचा विजयी षटकार अन् इंग्लंडचा ८ विकेट्सने विजय!, वाचा सविस्तर धावफलक






