झिम्बाब्वे येथे सुरू असलेल्या 2023 वनडे विश्वचषक क्वालिफायर्स स्पर्धेतून शनिवारी (1 जूलै) सर्वात धक्कादायक निकाल समोर आला. सुपर सिक्स फेरीच्या सामन्यात स्कॉटलंड संघाने वेस्ट इंडिजला 7 गडी राखून पराभूत केले. यासह वेस्ट इंडीज 2023 वनडे विश्वचषकासाठी पात्र होण्याच्या शर्यतीतून बाहेर पडला. पहिल्या दोन वनडे विश्वचषकाचे विजेतेपद जिंकणाऱ्या वेस्ट इंडिज संघाला आता विश्वचषकात सहभागी होता येणार नाही.
Scotland trump the West Indies and the two-time champions are out of contention to reach #CWC23 😱#SCOvWI: https://t.co/D0FGi8lXDh pic.twitter.com/zQ0LVGYKCE
— ICC (@ICC) July 1, 2023
दोन वेळा वनडे विश्वचषक जिंकणाऱ्या वेस्ट इंडिज संघावर यावेळी प्रथमच पात्रता फेरी खेळण्याची वेळ आली. पात्रता फेरीच्या पहिल्या फेरीतील अखेरच्या दोन सामन्यांमध्ये वेस्ट इंडिज संघाला झिम्बाब्वे व नेदरलँड्स संघाकडून पराभूत व्हावे लागले होते. तरीदेखील सुपर सिक्समध्ये प्रवेश करण्यात त्यांना यश आलेले. मात्र, विश्वचषकासाठी पात्र होण्याकरता त्यांना इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहण्याची गरज होती.
सुपर सिक्स फेरीतील त्यांचा पहिला सामना स्कॉटलंडविरुद्ध झाला. प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर वेस्ट इंडीज संघाकडून मोठ्या धावसंख्येची अपेक्षा होती. मात्र, ख्रिस सोल व ब्रेंडन मॅककुलन यांनी वेस्ट इंडिज संघाची वरची फळी अक्षरशा कापून काढली. त्यानंतर सफियान, मार्केट व ख्रिस ग्रॅव्ह यांनी देखील बळी मिळवले. त्यामुळे वेस्ट इंडिज संघ केवळ 181 पर्यंत मजल मारू शकला. जेसन होल्डरने सर्वाधिक 45 धावा केल्या.
या धावांचा पाठलाग करताना मॅककुलन व क्रॉस यांनी अर्धशतके करत केवळ तीन गड्यांच्या मोबदल्यात हे आव्हान पार करून दिले. वेस्ट इंडीजच्या पराभवामूळे झिम्बाब्वे व श्रीलंका यांचा विश्वचषकात खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
(2023 ODI World Cup Qualifiers Scotland Beat West Indies By 7 Wickets West Indies World Cup Qualifying Chances Over)
महत्वाच्या बातम्या-
‘मी तर हार्दिक पंड्याच्या आसपासही नाही…’, संघातून ड्रॉप करण्यावर प्रमुख खेळाडूचे खळबळजनक विधान
वनडे विश्वचषकात भारतासाठी चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार? ‘हे’ आहेत पाच पर्याय