इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड यानं विराट कोहलीबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. 2025 मधील भारताचा इंग्लंड दौरा हा विराट कोहलीचा शेवटचा इंग्लंड दौरा असेल, असं ब्रॉड म्हणाला.
भारतीय संघ पुढील वर्षी 20 जून ते 31 जुलै दरम्यान इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. तेव्हा कोहलीचं वय 36 वर्षांचं होईल. विराट कोहलीनं इंग्लंडमध्ये 2014, 2018 आणि 2021-22 मध्ये कसोटी मालिका खेळली आहे. 2025 ची कसोटी मालिका ही त्याची इंग्लंडमधील शेवटची कसोटी मालिका असू शकते. येथे नमूद करण्याजोगी बाब म्हणजे, विराट कोहलीनं 2024 टी20 विश्वचषकानंतर टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधील आकडेवारी शानदार आहे. मात्र त्याला इंग्लंडमध्ये तेवढी चांगली कामगिरी करता आलेली नाही. इंग्लंडमध्ये त्याची सरासरी 33.21 आहे. या मालिकेबाबत बोलताना स्टुअर्ट ब्रॉड म्हणाला, “विराटचा इंग्लंडचा हा शेवटचा दौरा असू शकतो. त्याच्याकडे भरपूर प्रतिभा आणि अनुभव आहे, तर इंग्लंडचा संघ थोडा तरुण आणि कमी अनुभवी आहे. परंतु त्यांच्यातही खूप प्रतिभा आहे. ते फ्रंट-फूट स्टाईल क्रिकेट खेळतात.”
स्टुअर्ट ब्रॉड म्हणाला, “जेव्हा भारतानं लॉर्ड्सवर (2021 मध्ये) विजय मिळवला आणि मालिका अनिर्णित राखली, तेव्हा इंग्लंडला किती वाईट वाटलं असेल याची कल्पनाही करता येणार नाही. हा एक आक्रमक कसोटी सामना होता. मोहम्मद सिराजनं शेवटच्या दिवशी शानदार गोलंदाजी केली. खेळपट्टी कोरडी होती. हा एक भावनिक कसोटी सामना होता. मला माहित आहे की, इंग्लंडच्या ड्रेसिंग रूमला किती दु:ख झालं होतं. आम्ही कोहलीच्या चेहऱ्यावर आनंद पाहिला आणि त्याच्यासाठी हे किती महत्त्वाचं आहे, हे देखील पाहिलं. मला वाटतं की, ही एक अतिशय रोमांचक मालिका होईल.”
हेही वाचा –
या खेळाडूनं ठोकलं प्रथम श्रेणी क्रिकेटमधील 26वं शतक, अजून टीम इंडियात संधी मिळालेली नाही!
बांग्लादेश कसोटीसाठी निवडले नाही, इराणी कपमध्ये चमकदार कामगिरी; न्यूझीलंड मालिकेत संधी मिळेल का?
श्रीलंकेच्या क्रिकेटपटूवर कडक कारवाई, आयसीसीनं लावली एका वर्षाची बंदी; कारण जाणून घ्या