सलामीवीर उस्मान ख्वाजा आणि कॅमरून ग्रीन यांच्या शतकाच्या जोरावर चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलिया संघ मजबूत स्थितीत आहे. ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूंनी सामन्याच्या दुसऱ्या दिवशीच 400हून अधिक धावांचा टप्पा पार करण्यात मोलाचा वाटा उचलला. संघ 500 धावांच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. अहमदाबाद कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या या धुरंधरांनी भारतीय गोलंदाजीची पिसे काढत विक्रम रचला आहे. पहिल्या दिवशी शतक ठोकणाऱ्या ख्वाजाला पाहून ग्रीननेही दुसऱ्या दिवशी शतक साजरे केले. ग्रीन शतक केल्यानंतर 114 धावांवर बाद झाला. मात्र, त्याने तंबूत परतण्यापूर्वी ख्वाजासोबत 200 धावांची भागीदारी पूर्ण केली. अशाप्रकारे त्यांच्या नावावर खास विक्रम नोंदवला गेला.
उस्मान ख्वाजा आणि कॅमरून ग्रीन भागीदारी
उस्मान ख्वाजा आणि कॅमरून ग्रीन यांनी 200हून अधिक धावांची भागीदारी रचत भन्नाट विक्रम रचला. भारतात खेळताना 200 किंवा त्याहून अधिक धावांची भागीदारी करणारी ही ऑस्ट्रेलियाची तिसरी जोडी बनली आहे. त्यांच्यात 208 धावांची भागीदारी झाली. त्यात ख्वाजाच्या 93 आणि ग्रीनच्या 114 धावांचा समावेश होता. ही भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाची दुसरी सर्वात मोठी भागीदारीदेखील आहे.
भारतात ऑस्ट्रेलियाच्या सर्वात मोठ्या भागीदाऱ्या
222 धावा- किम ह्यूज आणि ऍलन बॉर्डर (चेन्नई, 1979-80)
208 धावा- उस्मान ख्वाजा आणि कॅमरून ग्रीन (अहमदाबाद, 2022-23)*
207 धावा- नॉर्म ओनील आणि नील हार्वे (मुंबई, 1959-60)
इतकेच नाही, तर ख्वाजा आणि ग्रीनच्या जोडीने 2013नंतर भारतीय संघाविरुद्ध भारताच्या जमिनीवर कसोटीत 200हून अधिक धावांची भागीदारी करणारी फक्त दुसरी जोडी आहे. यापूर्वी 2021मध्ये चेन्नई कसोटीत इंग्लंडच्या डॉमिनिक सिबली आणि जो रूट यांनी मिळून 200 धावांची भागीदारी रचली होती.
सन 2013पासून भारतात 200हून अधिक धावांची भागीदारी (भारताविरुद्ध)
200 धावा- डॉमिनिक सिबली आणि जो रूट (चेन्नई, 2021)
208 धावा- उस्मान ख्वाजा आणि कॅमरून ग्रीन (अहमदाबाद, 2023)
कॅमरून ग्रीन 131व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर अश्विनची शिकार झाला. अशाप्रकारे उस्मान ख्वाजा आणि कॅमरून ग्रीन यांच्यातील भागीदारी 208 धावांवर तुटली. यावेळी ग्रीनने 170 चेंडूत 18 चौकारांच्या मदतीने 114 धावा केल्या. हे त्याचे पहिले शतक होते. (208 run stand between umsan khawaja and cameron green is the highest by any pair against india in india in the last 10 years)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शतक ठोकल्यानंतर हरमनप्रीतवर आलेलं भयंकर संकट, थेट आई-वडिलांना येत होते कॉल्स; वाचा काय घडलेलं
संतापजनक! धावांचा डोंगर उभा राहताच कर्णधार रोहित हादरला, पाणी घेऊन आलेल्या सहकाऱ्यावर मोक्कार चिडला