---Advertisement---

द्विशतक अन् २४ फेब्रुवारीचा ‘याराना’! ‘या’ तीन खेळाडूंनी एकाच दिवशी घातली दुहेरी शतकाला गवसणी

---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणत्याही फलंदाजाने झळकावलेल्या द्विशतकाला एक वेगळाच मान असतो. कसोटी क्रिकेटमध्ये जगभरातील कोणते ना कोणते दोन-तीन खेळाडू दुहेरी शतक झळकावत असतात. मात्र, वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणे जिकिरीचे बनते. वनडे क्रिकेट सुरू झाल्यानंतर जवळपास ४० वर्षानंतर पहिले द्विशतक ठोकले गेले. हे पहिले द्विशतक २४ फेब्रुवारी या दिवशी झळकावले गेले होते. मात्र, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, २४ फेब्रुवारी या तारखेला विविध वर्षी तीन वेगवेगळ्या फलंदाजांनी दुहेरी शतके साजरी झाली आहेत. विशेष म्हणजे यातील दोन फलंदाज हे भारतीय आहेत.

आज आपण त्याच तीन द्विशतकांविषयी जाणून घेणार आहोत.

१) सचिन तेंडुलकर
आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये सर्वप्रथम द्विशतक ठोकण्याचा मान भारताचा सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडूलकर याने मिळवला. २०१० साली भारत दौऱ्यावर आलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २४ फेब्रुवारी २०१० रोजी ग्वालियर येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वन डे सामन्यात सचिनने ही विश्‍वविक्रमी खेळी केली. सचिनने सलामीला येत १४७ चेंडूत २५ चौकार व ३ षटकारांच्या सहाय्याने नाबाद २०० धावांची खेळी साकारली.

२) एमएस धोनी
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी यांनी देखील आपल्या कारकिर्दीतील एकमेव कसोटीत द्विशतक २४ फेब्रुवारी २०१३ या दिवशी झळकावले होते. भारत दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध चेन्नई येथील पहिल्या कसोटीत तिसऱ्या दिवशी धोनीने फलंदाजीला येत २२४ धावांची लाजवाब खेळी केली. विशेष, म्हणजे धोनीने हे द्विशतक अवघ्या एका दिवसात झळकावले होते. यासह धोनी कसोटीत दुहेरी शतक झळकावणारा पहिला भारतीय कर्णधार बनला होता.

३) ख्रिस गेल
वेस्ट इंडिजचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल याने २०१५ वनडे विश्वचषकात झिम्बाब्वेविरुद्ध द्विशतक झळकावण्याची कामगिरी केली होती. योगायोगाने, गेलचे हे द्विशतक देखील २४ फेब्रुवारी याच दिवशी आले होते. गेलने आपल्या २१५ धावांच्या खेळीदरम्यान अनेक विक्रम आपल्या नावे केले होते. गेल विश्वचषकात द्विशतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरला होता. तसेच, मार्लन सॅम्युअल्ससोबत त्याने दुसऱ्या गड्यासाठी ३७२ धावांची भागीदारी केली होती.

महत्त्वाच्या बातम्या –

आठवतंय का? १२ वर्षांपूर्वी ३६ वर्षांच्या सचिन तेंडूलकरने क्रिकेटमध्ये घडवला होता इतिहास

‘सुट्टी तेव्हाच घेईल, जेव्हा…’, म्हणत रोहित शर्माने दिले बायो-बबलच्या प्रश्नावर स्पष्ट उत्तर

टी२० मालिकेपूर्वी श्रीलंकन कर्णधाराने सांगितले यशाचे सूत्र; ‘या’ खेळाडूंवर दाखवला विश्वास

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---