दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा कर्णधार टेम्बा बावुमा हा अतिशय शांत खेळाडू आहे आणि तो मैदानावरही आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवतो. परंतु, केशव महाराजनी शुक्रवारी (27 ऑक्टोबर) पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विजयी चौकार ठोकला, तेव्हा तो आपल्या भावनांना बाहेर येण्यापासून रोखू शकले नाही आणि त्यानी शानदार शैलीत विजय साजरा केला. त्याच्या या व्हिडिओला सोशल मीडियावर खूपच पसंती मिळत आहे.
आयसीसीने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये डेव्हिड मिलर(David Miller), कगिसो रबाडा (Kagiso Rabada) आणि टेम्बा बावुमा (Temba Bavuma) संघाच्या इतर सपोर्ट स्टाफ सदस्यांसह ड्रेसिंगरूममध्ये बसलेले सगळे चिंतीत असलेले दिसत आहेत. दरम्यान, केशव महाराज (Keshav Maharaj) याने मोहम्मद नवाजच्या चेंडूवर शॉट खेळून चौकार ठोकला. विजयी फटका पाहिल्यानंतर, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ड्रेसिंगरूममधून धावत सुटला आणि उत्साहात उड्या मारत विजयाचा आनंद साजरा करू लागला. त्याच वेळी, इतर सर्व खेळाडू आणि कर्मचारी सदस्य देखील खूप उत्साहित झालेले पहायला मिळाले.
विश्वचषकात पाकिस्तान संघाने नेहमीच दक्षिण आफ्रिकेच्या संघावर वर्चस्व गाजवले होते. 1999 नंतर, कोणत्याही विश्वचषकामध्ये पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात एकूण सहा सामने खेळले गेले आणि प्रत्येक वेळी आफ्रिकन संघाला पराभवाचा सामना करावा लागला. सातव्या प्रयत्नात टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखालील आफ्रिकन संघाला पाकिस्तानचा पराभव करण्यात यश आले.
दक्षिण आफ्रिकेचा या स्पर्धेतील हा पाचवा विजय असून आता त्यांनी गुणतालिकेत पहिले स्थान पटकावले आहे. या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा पुढील साखळी सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. पुण्यातील एमसीए स्टेडियमवर हा सामना १ नोव्हेंबरला होणार आहे. (24 hours have passed since the match but Bavuma celebration is still the talk of the town)
म्हत्वाच्या बातम्या
बाबरला ‘अशी’ वागणूक देणे अयोग्य! मिकी आर्थरने सांगितले पीसीबीचे काळे सत्य