इंडियन प्रीमियर लीग २०२२ चे (आयपीएल २०२२, IPL 2022) बिगूल वाजले असून २६ मार्चपासून या हंगामाची सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी सर्व फ्रँचायझींनी सरावालाही प्रारंभ केला आहे. यंदाचा आयपीएल हंगाम धमाकेदार होणार आहे, कारण यावेळी ८ ऐवजी १० संघ आयपीएलमध्ये खेळणार आहेत. तत्पूर्वी आयपीएल फ्रँचायझींसाठी एक वाईट बातमी पुढे येत आहे. जवळपास २६ परदेशी खेळाडू आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांना (26 Overseas Players To Miss Some IPL Matches) मुकण्याची शक्यता आहे. आयपीएल २०२२ वेळी ३ वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय मालिका खेळवल्या जाणार आहेत, याच कारणामुळे काही परदेशी खेळाडू आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकू शकतात.
आयपीएलदरम्यान होणाऱ्या ३ आंतरराष्ट्रीय मालिकांमध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड, पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश यांचा समावेश आहे. वेस्ट इंडिज आणि इंग्लंड संघातील मालिका २८ मार्च रोजी संपतील. तर २८ वर्षांनंतर पाकिस्तान दौऱ्यावर गेलेला ऑस्ट्रेलिया संघ ५ एप्रिलपर्यंत आंततराष्ट्रीय क्रिकेट मालिकांमध्ये व्यस्त असेल. बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेतील मालिका ११ एप्रिल रोजी संपतील.
कोणत्या संघाचे कोणते परदेशी खेळाडू आयपीएल सामन्यांना मुकतील?
इनसाइडस्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार, या तिन्ही मालिकांमध्ये खेळणारे परदेशी खेळाडू आयपीएल २०२२ च्या सुरुवातीच्या सामन्यांमधून बाहेर राहणे निश्चित आहे. यामध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग असलेले मुस्तफिजुर रेहमान, लुंगी एन्गिडी, एन्रिच नॉर्किए, मिचेल मार्श आणि मिचेल मार्श आणि डेविड वॉर्नर यांचा समावेश आहे. वॉर्नर ३० मार्च रोजी दिवंगत ऑस्ट्रेलियन खेळाडू शेन वॉर्नच्या अंतिम संस्कारात सहभागी झाल्यानंतर ५ एप्रिलपर्यंत भारतात पोहोचेल.
नव्या लखनऊ सुपर जायंट्सचे मार्कस स्टॉयनिस, जेसन होल्डर, कायले मेयर्स, मार्क वुड आणि क्विंटन डी कॉकसारखे परदेशी खेळाडू सुरुवातीच्या आयपीएल सामन्यांमध्ये अनुपलब्ध असतील. आयपीएलची दुसरी सर्वात यशस्वी फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्जचा ड्वेन प्रिटोरियस बांगलादेशविरुद्धची वनडे मालिका खेळल्यानंतर संघासोबत सहभागी होईल.
याखेरीज २ वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावणारा कोलकाता नाईट रायडर्स संघालाही नुकसानाचा सामना करावा लागतो. त्यांचे ऍरॉन फिंच आणि पॅट कमिन्स हे परदेशी खेळाडू ५ एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय मालिका संपल्यानंतर संघासोबत जोडले जातील. संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्स संघातील रासी वॅन डर डूसेन सुरुवातीच्या ५ सामन्यांमधून बाहेर असेल. तर सनरायझर्स हैदराबादचे सीन एबॉट, मार्को जेन्सन आणि ऍडम मार्करम आयपीएलच्या पहिल्या आठवड्यात खेळू शकणार नाहीत. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून ग्लेन मॅक्सवेल, जेसन बेहेरनडॉर्फ आणि जोश हेजलवुड सुरुवातीच्या सामन्यांमधून बाहेर असतील.
महत्त्वाच्या बातम्या-
पराजय हा शब्दच विसरलीये टीम इंडिया, बंगळुरु कसोटी जिंकत लिहिलाय इतिहास
कुठून येतो हा कॉन्फिडन्स? IPL आणि PSL बाबत रमीज राजा यांचे वक्तव्य पाहून तुम्हीही असंच म्हणाल
आयसीसी कसोटी क्रमवारीत भारत अव्वलस्थानी, पण स्थान टिकण्यासाठी पाकिस्तानच्या विजयाची गरज; वाचा