आयपीएल २०२२ स्पर्धेला (Ipl 2022) येत्या काही दिवसात सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी बेंगलोरमध्ये आयपीएल स्पर्धेसाठी लिलाव सोहळा पार पडला. या लिलाव सोहळ्यात अनेक असे खेळाडू होते, जे कोट्यवधी झाले. तर काही असे देखील खेळाडू होते, ज्यांना खाली हात परतावे लागले आहे. कोट्यवधी रुपयांची कमाई करणाऱ्या खेळाडूंमध्ये परदेशी खेळाडूंसह देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंचा देखील समावेश आहे. (ipl mega auctions)
आयपीएल २०२२ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात एकूण १० संघांनी २०४ खेळाडूंवर यशस्वी बोली लावली. या खेळाडूंवर एकूण ५५१ कोटी रुपये खर्च करण्यात आले. यामध्ये १३७ भारतीय आणि ६७ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. दरम्यान या लिलावात तामिळनाडू, दिल्ली आणि कर्नाटक राज्यातून एकूण १३-१३ खेळाडूंवर बोली लागली. या लिलावात एकूण २८ राज्यातील खेळाडू खेळताना दिसून येणार आहेत. या २८ राज्यांपैकी तामिळनाडू राज्यातील खेळाडूंवर सर्वाधिक ३९.५५ कोटींची बोली लावली.
तसेच कर्नाटक राज्यातील खेळाडूंवर एकूण २९.६० कोटींची बोली लागली. तर दिल्ली राज्यातील खेळाडूंवर २४.७० कोटींची बोली लागली. तर उत्तर प्रदेश क्रिकेट ॲकेडमीच्या १२ खेळाडूंवर २२.७० कोटींची बोली लागली. तर राजस्थान आणि मुंबईच्या खेळाडूंवर एकूण ९-९ कोटींची बोली लागली. तर बंगालच्या खेळाडूंवर एकूण ६ खेळाडूंवर ११.२० कोटींची लागली.
विदर्भातील ५ खेळाडूंवर एकूण २.८० कोटींची बोली लागली. यासह हैदराबाद राज्यातील खेळाडूंवर २९.९५ कोटी, झारखंड राज्यातील खेळाडूंवर १६.४५ कोटी, महाराष्ट्रातील खेळाडूंवर १०.४० कोटी, सौराष्ट्र संघातील खेळाडूंवर ६.३० तर मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश आणि उत्तराखंड राज्यातील प्रत्येकी ३-३ खेळाडूंना या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली आहे.
महत्वाच्या बातम्या :
आयपीएल २०२२ मध्ये अशा असू शकतात सर्व १० फ्रँचायझींच्या सलामी जोड्या, पाहा संपूर्ण यादी






