24 जानेवारीपासून भारतीय संघाच्या न्यूझीलंड दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध 5 टी20, 3 वनडे आणि 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. टी२० विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने ही ५ टी२० सामन्यांची मालिका अतिशय महत्त्वाची आहे.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसाठी मात्र ही टी२० मालिका विक्रमांची खाण घेऊन आली आहे. विराट हा आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने ७८ सामन्यात त्याने ५२.७२च्या सरासरीने २६८९ धावा केल्या आहेत.
परंतु आता त्याला सर्व प्रकारच्या ट्वेंटी-ट्वेंटी सामन्यांतील एक खास विक्रम खुणावत आहे. विराटने सर्व प्रकारच्या ट्वेंटी-ट्वेंटी प्रकारात मिळून २७७ सामन्यांत ८७९५ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ४१.४८ची असून त्याने यात ५ शतके व ६४ अर्धशतके केली आहेत.
९००० धावा करणारा ६वाच खेळाडू-
ट्वेंटी-ट्वेंटी प्रकारात ९ हजार धावा करणारा जगातील ६वा खेळाडू ठरण्यासाठी विराटला केवळ २१५ धावांची गरज आहे. ५ टी२० सामने पहाता विराटला हा विक्रम करण्याची नामी संधी आहे.
ट्वेंटी-ट्वेंटी प्रकारात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज-
१३२९६- ख्रिस गेल, सामने- ४०४
९९६६- केराॅन पोलार्ड, सामने- ४९९
९९२२- ब्रेंडन मॅक्क्युलम, सामने- ३७०
९५९५- शोएब मलिक, सामने- ३७६
९०९०- डेव्हिड वाॅर्नर, सामने- २७७
८७९५- विराट कोहली, सामने- २७७
https://twitter.com/Maha_Sports/status/1219932532071813120
https://twitter.com/Maha_Sports/status/1219929121314074625
https://twitter.com/Maha_Sports/status/1219919106138226690
https://twitter.com/Maha_Sports/status/1219922866369523713