पुणे: साई9स्पोर्ट्स यांच्या तर्फे दुसऱ्या श्री.शरदचंद्रजी पवार प्रौढ करंडक क्रिकेट स्पर्धेचे आयोजनकरण्यात आले आहे. हि स्पर्धा नेहरू स्टेडियम, व्हिजन क्रिकेट अकादमी येथील क्रिकेट मैदानावर 9 ते 12 डिसेंबर 2018 याकालावधीत होणार आहे.
स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना स्पर्धेचे संचालक अनिलवाल्हेकर व साई9 स्पोर्ट्सचे संस्थापक साईराज गायकवाड,माजी रणजीपटू शंतनु सुगवेकर यांनी सांगितले कि, स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून या स्पर्धेला गोल्डफिल्ड प्रॉपर्टीज यांचेप्रायोजकत्व लाभले आहे.
स्पर्धेत डी. बी.देवधर इलेव्हन, भाऊसाहेब निंबाळकर इलेव्हन, राजू भालेकर इलेव्हन आणि वसंत रांजणे इलेव्हन हे 4 संघ सहभागी झाले आहेत.
तसेच, हि स्पर्धा साखळी व बाद पद्धतीने खेळविण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघाला करंडक वआकर्षक अशी पारितोषिके देण्यात येणार आहे. याशिवाय सर्वोत्कृष्ट फलंदाज, सर्वोत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर,सामनावीर या खेळाडूंना करंडक अशी पारितोषिके देण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
स्पर्धेचे उदघाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते रविवार, दि.9डिसेंबर रोजी सकाळी 7.30 वाजता व्हिजन क्रिकेट अकादमी येथे होणार आहे.