भारताविरुद्ध 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत व्हाईटवॉश मिळाल्यानंतर न्यूझीलंड संघाने बुधवारी (5 फेब्रुवारी) भारताविरुद्ध (New Zealand vs India) पहिल्या वनडे (1st ODI Match) सामन्यात 4 विकेट्सने विजय (Won By 4 Wickets) मिळविला होता. त्यामुळे आता या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत टिकून राहण्यासाठी भारताला दुसऱ्या वनडे सामन्यात विजय मिळवावा लागेल.
पहिल्या वनडे सामन्यात भारताच्या खेळाडूंकडून खराब क्षेत्ररक्षण झाले होते. त्यामुळे आता भारताला दुसरा वनडे सामना जिंकण्यासाठी संघात बदल करावे लागणार आहेत.
दुसऱ्या वनडे सामन्यापुर्वी भारतीय संघाने सराव सत्रात भाग घेतला होता. यामध्ये भारताचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनी (Navdeep Saini) आणि शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) या दोन्ही खेळाडूंनी भाग घेतला. यामध्ये त्यांनी गोलंदाजी आणि फलंदाजी केली.
ठाकूरने न्यूझीलंडविरुद्ध टी20 सामन्यांमध्ये जास्त धावा दिल्या होत्या. तसेच पहिल्या वनडे सामन्यातही त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे दुसऱ्या वनडे सामन्यासाठी भारतीय संघात सैैनीला संधी देण्याची शक्यता आहे.
त्याचबरोबर भारतीय संघात पहिल्या वनडे सामन्यात संधी दिलेल्या केदार जाधवच्या (Kedar Jadhav) भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. निवडकर्त्यांनी संघात संतुलन राहण्यासाठी जाधवला अंतिम अकरा जणांमध्ये स्थान दिले होते.
परंतु भारताचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) हॅमिल्टनमधील पहिल्या वनडे सामन्यात त्याला गोलंदाजी करू दिली नाही. कदाचित बाऊंड्री लहान असल्यामुळे त्याला गोलंदाजीला संधी दिली नसावी. परंतु, हॅमिल्टनमधील मैदान खूपच लहान असल्यामुळे शिवम दुबे (Shivam Dube) किंवा मनीष पांडेला (Manish Pandey) संधी देण्याची शक्यता आहे.
भारताचा पुढील वनडे सामना ऑकलंड (Auckland) येथे शनिवारी (8 फेब्रुवारी) होणार असून या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 7.30 वाजता सुरुवात होणार आहे.
न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया-
विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), केदार जाधव, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी, जसप्रीत बुमराह
भारताचे टेंशन वाढणार; दुसऱ्या वनडेत करावा लागणार ६ फूट ८ इंचावरुन येणाऱ्या चेंडूचा सामना
वाचा👉https://t.co/JNJwxs3V3p👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #NZvIND— Maha Sports (@Maha_Sports) February 7, 2020
१९ वर्षांखालील विश्वचषकाच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना होणार 'या' संघाशी
वाचा👉https://t.co/NIGws3UZUk👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #U19CWC— Maha Sports (@Maha_Sports) February 7, 2020