पुणे, १३ ऑक्टोबर २०२३: सायकलिंग असोसिएसन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने व क्रीडा प्रबोधिनी माजी सायकलिस्ट असोसिएशन यांच्या सहकार्याने दुसऱ्या महाराष्ट्र राज्य ट्रॅक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत राज्यभरातून १५० खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. हि स्पर्धा १४ आणि १५ ऑक्टोबर रोजी पुणे म्हाळुंगे बालेवाडी येथील राज्य शासनाच्या श्री शिव छत्रपती क्रीडा संकुलामधील सायकलिंग व्हेलोड्रमवर होणार आहे.
सायकलिंग असोसिएसन ऑफ महाराष्ट्राचे सचिव प्रताप जाधव यांनी सांगितले की, या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील सुमारे १५० सायकलपट्टू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. हि स्पर्धा युथ (१४ वर्षे), १६ (सब ज्युनिअर), १८ वर्षे (ज्युनिअर) आणि ईलीट (वरिष्ठ) वयोगटात मुले, मुली, पुरुष आणि महिला अशा आठ वयोगटात पार पडणार आहे.
आंतरराष्ट्रीय सायकलपट्ट पूजा दोनोले, वेदांत ताजणे, वेदांत जाधव, संध्या कोकाटे, यांच्यासह राष्ट्रीय पदक विजेते आदिती डोंगरे, झायना पिरखान, स्नेहल माळी या मानांकित सायकलपटूंनी या स्पर्धेत आपला सहभाग निश्चित केला आहे.
आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक दिपाली पाटील, मिलींद झोडगे, उत्तम नाळे या क्रीडा प्रबोधिनी माजी सायकलिस्ट असोसिएशनच्या माजी राष्ट्रीय खेळाडू आणि त्यांच्या सहका-यांनी सलग दुस-या वर्षी या स्पर्धांचे आयोजन करण्यात पुढाकार घेतला आहे. शनिवारी सकाळी नगरसेवक श्री. सनी निम्हण यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
‘गोलंदाजी आता त्यांची कमजोरी बनली आहे’, भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी दिग्गजाचं पाकिस्तान संघाविषयी मोठं वक्तव्य
BAN vs NZ । बोल्टपुढे ब्रेट ली पडला फिका! वनडेत 200 विकेट्स घेत नावावर केला नवा विक्रम