कसोटी क्रिकेटला सर्वात आव्हानात्मक स्वरुप मानले जाते. या प्रकारात खेळाडूंचा कस पाहिला जातो. या प्रकारात बऱ्याचदा फलंदाज खेळपट्टीवर आधी स्थिर होतात आणि नंतर आपले फटके मारण्याचा प्रयत्न करतात. असे असले तरी, काही असेही खेळाडू आहेत, जे कसोटीमध्येही आक्रमक फलंदाजी करतात. काही असेही फलंदाज आहेत, ज्यांनी कसोटीत सलग तीन चेंडूंवर षटकार मारले आहेत. या लेखातही आपण तीन अशा फलंदाजांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी कसोटीत सलग ४ षटकार मारले आहेत.
१) कपिल देव
भारतीय संघ १९९० मध्ये इंग्लंड दौऱ्यावर असताना लाॅर्डस येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत इंग्लंडने पहिला डाव ४ विकेट्स ६५३ धावांवर घोषित केला. प्रत्युतरात भारतीय संघाने फलंदाजी चांगली केली. परंतु, संघाला फॉलोऑनसाठी २४ धावांची गरज होती. भारताने ४३० धावांवर आपली नववी विकेट गमावली होती. शेवटी कपिल देव आणि नरेंद्र हिरवानी हे फलंदाज क्रिजवर होते. यादरम्यान कपिल देवने असे काही केले की सर्वजण आश्चर्यचकित झाले. फिरकी गोलंदाज एडी हेमिंग्सच्या पहिल्या चेंडूवर कपिल देवने सलग ४ चेंडूवर ४ षटकार मारले आणि भारताला फाॅलोऑन टाळण्यासाठी मदत केली. कपिल देव कसोटी इतिहासात सलग ४ षटकार ठोकणारा पहिला फलंदाज ठरला .
२) शाहिद आफ्रिदी
पाकिस्तानचा धडाकेबाज फलंदाज शाहिद आफ्रिदीने एकदिवसीय आणि टी२० मध्ये अनेक विक्रम केले आहेत. तसेच कसोटीत त्याने विरुद्ध संघाच्या गोलंदाजांची धूलाई केली आहे. २००६ मध्ये भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये लाहोरमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटीत आफ्रिदीने सलग ४ चेंडूवर ४ षटकार लगावले होते. तो अशी कामगिरी करणारा दूसरा खेळाडू बनला होता. या सामन्यात हरभजन सिंगच्या चेंडूवर आफ्रिदीने ४ षटकार मारत विक्रम केला होता.
३) एबी डीविलियर्स
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात २००९ मध्ये खेळल्या गेलेल्या कसोटीत आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डीविलियर्सने सर्वोत्तम खेळी खेळली होती. त्याने या सामन्यात सलग ४ चेंडूवर ४ षटकार लगावले होते. दक्षिण आफ्रिका संघ या सामन्यात चांगल्या स्थितीत होता आणि डीविलियर्स शतक केले होते. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज एंड्रयू मॅकडोनाल्डच्या चेंडूवर त्याने सलग ४ षटकार ठोकले होते. यानंतर एबी डीविलियर्स सुद्धा कपिल देव आणि आफ्रिदीच्या यादीत समाविष्ट झाला.
महत्त्वाच्या बातम्या-
‘बेबीसिटर’ पंत! संघ-सहकाऱ्याच्या मुलासोबत खेळताना दिसला टोपीचा अनोखा खेळ, पाहा क्यूट व्हिडिओ
युझवेंद्र चहलने राजस्थान रॉयल्सचे ट्वीटर अकाउंट केले हॅक? स्वत:लाच फ्रँचायझीचा बनवले नवा कर्णधार
भज्जी पुन्हा घेणार ‘फिरकी’, करणार जोरदार ‘फटकेबाजी’; हरभजनच्या नव्या इनिंगला लवकरच सुरुवात?