आयसीसी टी-20 विश्वचषक रविवारी म्हणजेच 16 ऑक्टोबर 2022 रोजी सुरू होत आहे. 2007 साली टी-20 फॉरमॅटमधील पहिला विश्वचषक खेळला गेला, जो एमएस धोनीच्या नेतृत्वातील भारताने जिंकला होता. तेव्हापासून आजपर्यंत एकूण सात टी-20 विश्वचषक खेळले गेले आणि यावर्षी आठवा विश्वचषक खेळला जात आहे. यादरम्यान अनेक खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आणि ऐतिहासिक विक्रमही नावावर केले. आपण या लेखात अशात तीन खेळाडूंचा विचार करणार आहोत, ज्यांनी टी-20 विश्वचषकाच्या एका हांगामात सर्वाधिक धावा केल्या आहेत.
टी-20 विश्वचषकाच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करणारे तीन खेळाडू
#3 बाबर आजम – 303 धावा (टी20 विश्वचषक 2021)
मागच्या वर्षी यूएईत खेळल्या गेलेल्या विश्वचषकात पाकिस्तान संघ जबरदस्त फॉर्ममध्ये होता. संघ सुपर 12 फेरीत अजिंक्य राहिला होता आणि उपांत्य फेरीतही जागा पक्की केली होती. पाकिस्तानच्या या प्रदर्शनामागे कर्णधार बाबर आझम () याची खेळी महत्वपूर्ण ठरली. बाबर आझम (Babar Azam) या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने खेळलेल्या एकूण 6 सामन्यांमध्ये 60.60 च्या सरासरीने 303 धावा केल्या. या प्रदर्शनानंतर बाबर टी-20 विश्वचषकाच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तिसरा क्रमांक पटकावला.
#2 तिलकरत्ने दिलशान – 317 धावा (टी20 विश्वचषक 2009)
तिकलरत्ने दिलशान (Tilakratne Dilshan) श्रीलंकन संघाचा इतिहासातील मोठ्या दिग्गजांपैकी एक आहे. त्याने संघासाठी मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये जबरदस्त प्रदर्शन केले आहे. खासकरून मोठ्या आणि प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये त्याचे प्रदर्शन अधिकच आक्रमकतेने खेळायचा. 2009 टी-20 विश्वचषकात त्याची बॅट खूप चालली. त्याने या हंगामातील सात सामन्यांमध्ये तीन अर्धशतकांच्या मदतीने 317 धाा केल्या होत्या. यादरम्यान त्याची सर्वाधिक धावसंख्या 96 धावा राहिली होती. ही खेळी त्याने वेस्ट इंडीजविरुद्ध उपांत्य सामन्यात केली होती. दिलशान विश्वचषकाच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.
#1 विराट कोहली – 319 धावा (टी20 विश्वचषक 2014)
विराट कोहली (Virat Kohli) टी-20 विश्वचषक 2014 मध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये होता. त्याने भारतीय संघासाठी या विश्वचषकात 106.33 च्या जबरदस्त सरासरीने 319 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने 4 अर्धशतक ठोकले होते. त्याची सर्वात मोठी खेळी 77 धावांची होती. विराट कोहलीने विश्वचषकाच्या या हंगामात ज्या पद्धतीने खेळला, त्यामुळे तो विश्वचषकाच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याचा हा विक्रम आजही अबाधित आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
बुमराहविना खेळणाऱ्या टीम इंडियाबद्दल दिग्गजाने केले महत्वाचे वक्तव्य; म्हणाला…
‘विश्वचषकापेक्षा त्याची फिटनेस महत्वाची’, दुखापतग्रस्त खेळाडूविषयी रोहित शर्माचे मोठे विधान