भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या तिसर्या कसोटी सामन्याला ७ जानेवारीपासून सुरुवात झाली. सिडनीच्या मैदानावर खेळविण्यात येत असलेल्या या सामन्यात तिसर्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियन संघ मजबूत स्थितीत आहे. दुसर्या डावात फलंदाजी करताना त्यांनी २ बाद १०३ धावांची मजल मारली असून त्यांच्याकडे एकूण १९७ धावांची आघाडी आहे.
खरंतर या सामन्याच्या तिसर्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली, तेव्हा भारतीय संघ सामन्यात काहीसा पुढे होता. फलंदाजांसाठी अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात ३३८ धावांवर रोखून भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी बजावली होती. तसेच सलामीवीरांनी भारतीय फलंदाजीला सकारात्मक सुरुवात देखील करून दिली होती. त्यामुळे तिसर्या दिवशी सकाळी कर्णधार अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा फलंदाजीला उतरले, त्यावेळी भारत मोठी धावसंख्या आज दिवसभरात उभारेन, असेच सगळ्यांना वाटले होते.
मात्र भारतीय संघाने वर्चस्व गाजवण्याची ही चालून आलेली ही संधी गमावली. याला भारताने केलेल्या तीन मोठ्या चुका कारणीभूत ठरल्या. या लेखात आपण त्याच चुकांबद्दल जाणून घेणार आहोत.
१) चांगल्या सलामीचा फायदा उठवण्यात अपयशी
भारतीय संघाने या सामन्यात शुबमन गिल आणि रोहित शर्मा ही सलामीवीरांची नवी जोडी आजमावून पाहिली. विशेष म्हणजे या दोघांनीही सकारात्मक फटके खेळत भारतीय डावाला आश्वासक सुरुवात करून दिली. मात्र या सुरुवातीचा फायदा भारताला उचलता आला नाही. रोहित शर्मा २७ तर शुबमन गिल ५० धावा काढून बाद झाले. त्यानंतर आलेल्या फलंदाजांनीही या सुरुवातीचा लाभ उठवला नाही.
२) रहाणे-पुजाराची संथ फलंदाजी
कर्णधार अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांनी तिसर्या दिवशी अतिशय संथ गतीने फलंदाजी केली. रहाणेने ७० चेंडूत २२ तर पुजाराने १७६ चेंडूत ५० धावा काढल्या. त्यांच्या या बचावात्मक पवित्र्याने इतर सहकारी फलंदाजांवर दबाव वाढला.
३) तीन फलंदाज रन आउट
कसोटी क्रिकेटमध्ये रन आउट होणे, हे कुठल्याही फलंदाजासाठी अशोभनीय असते. मात्र भारताच्या डावात एक किंवा दोन नव्हे, तर चक्क तीन फलंदाज रन आउट होऊन माघारी परतले. हनुमा विहारी, आर अश्विन आणि जसप्रीत बुमराह हे तीन फलंदाज रन आउट होऊन तंबूत आले. त्यामुळे भारताचा डाव २४४ धावांवर संपुष्टात आला.
महत्त्वाच्या बातम्या –
खरं की काय? रिषभ पंतने ‘या’ रेकाॅर्डमध्ये सर विवियन रिचर्ड्स यांनाही मागे टाकलंय; वाचा पराक्रम
कॉमेंट्री करतेवेळी शेन वॉर्नने दिली मार्नस लॅब्यूशानेला शिवी अन् पुढे घडलं असं काही
लायसन्स तर नाय पण गाडी भारी चालवतंय! चिमुकल्याचा ‘हा’ व्हिडिओ सोशलवर हीट