काल (१९ सप्टेंबर) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघातील रोमांचक सामन्याने आयपीएलच्या तेराव्या हंगामाची सुरुवात झाली. अबू धाबी येथील शेख झायेद स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात चेन्नईने ५ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला.
या सामन्यासह भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने ४३७ दिवसांनंतर क्रिकेट मैदानावर पुनरागमन केले. नुकताच आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या धोनीने जुलै २०१९पासून क्रिकेट खेळले नव्हते. असे असले तरी, ३९ वर्षीय धोनीच्या प्रदर्शनात काहीही फरक जाणवला नाही. त्याने आपल्या दमदार नेतृत्त्व शैलीने संघाला केवळ सामना जिंकून दिला नाही, तर ३ मोठे विक्रमही आपल्या नावावर केले. 3 Big Records Of Chennai Super Kings Captain MS Dhoni
कालच्या सामन्यात यष्टीमागे मुंबईच्या कायरन पोलार्ड आणि क्रुणाल पंड्याचा झेल पकडत धोनीने त्याचे आयपीएल कारकिर्दीतील १०० झेल पूर्ण केले आहेत. त्याने यष्टीमागे ९६ आणि क्षेत्ररक्षण करत असताना ४ असे एकूण १०० झेल पकडले आहेत. याव्यतिरिक्त धोनीने यष्टीमागे २ विकेट्स घेत त्याच्या टी२० क्रिकेट कारकिर्दीतील यष्टीमागील २५० विकेट्स पूर्ण केल्या आहेत. असे करणारा तो जगातील पहिलाच यष्टीरक्षक ठरला आहे.
तर, कर्णधार म्हणूनही धोनीने एक शानदार विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने चेन्नईचे नेतृत्त्व करत असताना काल १००वा आयपीएल सामना जिंकला आहे. यासह आयपीएल इतिहासात एकाच संघाकडून १०० सामने जिंकणारा तो पहिलाच कर्णधार बनला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
सामना जिंकूनही धोनी दिसला नाही समाधानी; हे आहे कारण
सीएसकेला बसला मोठा झटका; हा खेळाडू दुसऱ्या सामन्यातूनही पडणार बाहेर
यंदा आयपीएलमधून माघार घेतलेल्या सुरेश रैनाने सीएसकेला दिल्या खास शुभेच्छा; म्हणाला…
ट्रेंडिंग लेख –
वाढदिवस विशेष: राशिद खान विषयी माहित नसलेल्या ५ खास गोष्टी…
सौरभ तिवारी आणि मुंबई इंडियन्स ‘ये रिश्ता कुछ तो कहलाता है’
‘तो’ संघ जो आयपीएलची सुरुवात होण्याआधीच बनतो अंतिम सामन्याचा दावेदार!