---Advertisement---

टी20 विश्वचषकात ‘या’ 3 संघांचा उठू शकतो बाजार, एकाने दोनदा जिंकलाय विश्वचषक

On: शनिवार, ऑक्टोबर 15, 2022 11:55 PM
AUS-And-SA
---Advertisement---

क्रिकेटमध्ये कधीच कोणत्याही एका खेळाडूचा किंवा संघाचा दबदबा कायम राहू शकत नाही. याचे सर्वात मोठे उदाहरण वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया या संघांच्या रूपात दिले जाऊ शकते. एकेकाळी या दोन संघाचा क्रिकेटमध्ये बोलबाला असायचा. अशात टी20 सारख्या क्रिकेटप्रकारात प्रत्येक संघांना आपला दबदबा कायम राखण्यासाठी खेळाडू आणि संघ व्यवस्थापनामध्ये विकासात्मक धोरण राबवावे लागते. तेव्हा कुठे जाऊन संघ दीर्घ काळापर्यंत टी20 क्रिकेट प्रकारात स्वत:ला स्थापित करण्यात यशस्वी होतात.

आगामी टी20 विश्वचषक 2022मध्ये (T20 World Cup 2022) कदाचितच असा कोणता संघ असेल, जो नेहमीप्रमाणे चांगले प्रदर्शन करेल आणि जिंकण्याची दावेदारी ठोकेल. याव्यतिरिक्त असे काही संघही आहेत, जे अपेक्षेनुसार कामगिरी करण्यात अपयशी ठरतील. या लेखात आपण अशाच तीन संघांबद्दल जाणून घेऊया.

असे तीन संघ, जे आपल्या प्रदर्शनाने करू शकतात चाहत्यांना निराश
1. ऑस्ट्रेलिया
जवळपास 2 दशके क्रिकेट विश्वावर राज्य करणारा ऑस्ट्रेलिया संघ आज क्रिकेटमध्ये त्या टप्प्यावर नाहीये. टी20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने मागील वर्षी सर्वांना आश्चर्याचा धक्का देत विश्वचषकावर आपले नाव कोरले होते. मात्र, त्यांचे सध्याचे प्रदर्शन फार चांगले राहिले नाहीये. आधी त्यांना भारतात टी20 मालिका गमवावी लागली आणि नंतर इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात खेळलेल्या टी20 मालिकेत पराभूत केले.

ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार ऍरॉन फिंच (Aaron Finch) हादेखील सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. दुसरीकडे, संघाची अखेरच्या षटकातील गोलंदाजीही कमकुवत दिसत आहे. ऑस्ट्रेलियाचा सध्याचा फॉर्म पाहता असे म्हटले जात आहे की, या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला संघर्ष करावा लागू शकतो.

2. दक्षिण आफ्रिका
दुर्दैवाची बाब म्हणजे, दक्षिण आफ्रिका संघाला आतापर्यंत एकदाही आयसीसी विश्वचषक जिंकता आला नाहीये. त्यांना आगामी टी20 विश्वचषकातही संघर्ष करावा लागू शकतो. संघाला नुकतेच झालेल्या मालिकेत भारतीय संघाने पराभूत केले. संघाचा कर्णधार टेम्बा बावुमा (Temba Bavuma) हादेखील भलताच खराब फॉर्ममधून जात आहे. दुसरीकडे, गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं, तर कागिसो रबाडालाही पुरेसा पाठिंबा मिळत नाहीये. अशात संघ अनेक अडचणींमधून जात आहे. हे पाहता, दक्षिण आफ्रिका संघही या विश्वचषकात संघर्ष करताना दिसू शकतो.

3. वेस्ट इंडिज
वेस्ट इंडिज हा एकमेव असा संघ आहे, ज्याने दोन वेळा टी20 विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. मात्र, संघ मागील काही काळापासून सातत्याने खराब प्रदर्शन करत आहे. यावेळी सुपर 12 फेरीमध्येही संघाला स्थान मिळवता आले नाही. वेस्ट इंडिज क्रिकेट संघ सध्या खूपच खराब काळातून जात आहे, त्यामुळे त्यांच्या मुख्य गोलंदाजांनीही आपल्या देशाकडून खेळण्यास नकार दिला आहे.

अशात हा एकेकाळचा बलाढ्य संघ कमजोर दिसत आहे. संघात अनेक युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. मात्र, त्यांची कामगिरी अद्याप विश्वास निर्माण करणारी ठरू शकली नाहीये. अशात वेस्ट इंडिजची वाट सोपी होणार नाहीये. तसेच, पुन्हा एकदा संघ आपल्या खराब प्रदर्शनामुळे निराश करू शकतो.

अशात हे संघ टी20 विश्वचषकात कशाप्रकारे प्रदर्शन करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आता हे काय मध्येच! वॉर्नर भारताविरुद्धच्या सामन्यातून होणार बाहेर? पण कॅप्टनला नाही कसलीच चिंता
टी-20 विश्वचषकात ‘या’ तिघांचे प्रदर्शन विसरता येणार नाही, एका हंगामात केल्यात सर्वाधिक धावा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---