कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे. भारतात जी काही परिस्थिती आहे, ते पाहून असे वाटते की आयपीएलचे आयोजन करणे कठीण आहे.
जर लवकरात लवकर परिस्थिती आटोक्यात आली नाही, तर आयपीएल २०२०चा १३ वा हंगाम (IPL 2020 13th Seaon) होणार नाही. आयपीएलमुळे खेळाडूंबरोबरच अनेक लोकांना रोजगार मिळतो. त्यामुळे जर आयपीएल रद्द झाले तर बीसीसीआयसोबत सर्वांनाच खूप नुकसान होऊ शकते.
आयपीएलचे आयोजन भारतात नाही झाले तर, इतर देशांमध्ये आयपीएलचे आयोजन करण्याचा पर्याय आहे. असे अनके देश आहेत, जिथे आयपीएलचे आयोजन केले जाऊ शकते. यापूर्वीही अनेकवेळा देशाबाहेर आयपीएलचे आयोजन करण्यात आले आहे. अशामध्ये बीसीसीआय यावेळीही देशाबाहेर आयपीएलचे आयोजन करण्याचा पर्याय निवडू शकते. आयपीएलचे आयोजन करण्यासाठी योग्य असलेल्या देशांचा घेतलेला आढावा.
या ३ देशात आयपीएलचे आयोजन केले जाऊ शकते-
१. श्रीलंका-
आयपीएलचे आयोजन श्रीलंकेमध्ये (Sri Lanka) केले जाऊ शकते. याठिकाणी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव भारताच्या तुलनेत फार कमी आहे. येथे कोरोना व्हायरसची प्रकरणे ५०० पेक्षा कमी आहेत. त्यामुळे श्रीलंकेत परिस्थिती आटोक्यात आहे. काही दिवसांत ही परिस्थिती साधारण होईल. त्यामुळे आयपीएलचे आयोजन श्रीलंकेमध्ये होऊ शकते.
सर्वात चांगली गोष्ट म्हणजे स्वत: श्रीलंका क्रिकेट बोर्डाने (Sri Lanka Cricket Board) बीसीसीआयसमोर हा प्रस्ताव ठेवला आहे.
श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शमी सिल्वा (Shami Silva) यांनी कोलंबो येथे बोलताना सांगितले की, “असे वाटते की, श्रीलंकेत कोरोना व्हायरसवर भारताच्या अगोदर नियंत्रण आणले जाऊ शकते. या ठिकाणी या व्हायरसचा प्रादुर्भाव लवकर संपेल. जर असे झाले तर आयपीएलचे आयोजन याठिकाणी केले जाऊ शकते. आम्ही लवकरच याविषयी बीसीसीआयला एक पत्र लिहिणार आहोत.”
२. न्यूझीलंड-
इतर देशांच्या तुलनेत न्यूझीलंडमध्ये कोरोना व्हायरसची (Corona Virus) प्रकरणे अधिक नाहीत. जर सर्वकाही व्यवस्थित झाले तर काही दिवसांत येथील परिस्थितीवर नियंत्रण आणले जाऊ शकते. न्यूझीलंड (New Zealand) खूप सुंदर देश आहे. तसेच भारतीय खेळाडूही येथे खेळले आहेत. न्यूझीलंडच्या अनेक खेळाडूंचा आयपीएलमध्ये समावेश आहे.
त्यामुळे आयपीएलच्या आयोजनासाठी न्यूझीलंड हा देश चांगला पर्याय ठरू शकतो.
३. दक्षिण आफ्रिका-
श्रीलंका आणि न्यूझीलंडच्या तुलनेत दक्षिण आफ्रिकेत (South Africa) कोरोना व्हायरसचे सर्वाधिक प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे याठिकाणी आयपीएलचे आयोजन करण्याची शक्यता फार कमी आहे. तरीही येत्या काही दिवसांत परिस्थितीवर नियंत्रण आणले जाऊ शकते.
यापूर्वी २००९मध्ये भारतात निवडणूकांमुळे दक्षिण आफ्रिकेत आयपीएलचे आयोजन करण्यात आले होते. येथेही आयपीएलची लोकप्रियता खूप आहे. त्यामुळे आयपीएलचे आयोजन करण्यासाठी दक्षिण आफ्रिकादेखील एक पर्याय ठरू शकतो.
ट्रेंडिंग घडामोडी-
-आफ्रिदी म्हणतो, भारताचा हा खेळाडू आहे जरा जास्तच गर्विष्ठ
-या ४ कारणांमुळे धोनीने क्रिकेटमधून व्हावे निवृत्त
-जेव्हा पाकिस्तानच्या या खेळाडूने गांगुलीला जखमी करण्यासाठी केला होता प्लॅन