कसोटी, एकदिवसीय आणि टी 20 क्रिकेटमध्ये विविध प्रकारचे फलंदाज दिसतात. काही खेळाडू वेगवान खेळतात, तसेच काही असेही खेळाडू आहेत जे धिम्या गतीने आपली खेळी करत असतात. बरेच फलंदाज फक्त तंत्राच्या मदतीने खेळत राहतात. आक्रमकता किंवा बचावात्मक शैलीसह प्रत्येक फलंदाजाची स्वतःची एक वेगळी ओळख असते.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगवेगळया प्रसंगी बरेच असे खेळाडू पाहिले गेले आहेत, जे खराब चेंडूची वाट पाहतात आणि हवेत फटकेबाजी करायचे टाळतात. भारतासह जगभरात या प्रकारचे बरेच खेळाडू झाले आहेत ज्यांच्या बॅटमधून मोठ्या मुश्किलीने षटकार निघायचा. पण एकदिवसीय आणि टी20 प्रकाराने क्रिकेटला गती दिली आणि अनेक खेळाडू हवेत फटके मारण्याचा आत्मविश्वास बाळगू लागले. पण अनेक खेळाडू असे पण आहेत, त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी षटकार लगावलाही नाही. या लेखात अशा दिग्गज खेळाडूंबद्दल जाणून घेऊ, ज्यांनी एकदिवसीय कारकीर्दीत कधीही षटकार मारलेला नाही. विशेष म्हणजे ५० हून अधीक एकदिवसीय सामने खेळले आहेत.
डियोन इब्राहिम :
झिम्बाब्वेतून येणाऱ्या डियोन इब्राहिम या खेळाडूने आपल्या एकदिवसीय कारकीर्दीत कधीही षटकार मारलेला नाही. विशेष बाब म्हणजे एकदिवसीय सामान्याव्यतिरिक्त कसोटीतही त्यांनी चेंडूला थेट सीमारेषेच्या बाहेर पाठवले नाही. 82 एकदिवसीय सामने या खेळाडूने खेळले. या व्यतिरिक्त आपल्या कारकीर्दीत इब्राहिमने 29 कसोटी सामनेही खेळले.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावे एक शतक आणि चार अर्धशतके आहेत. या व्यतिरिक्त कसोटीमध्ये त्याने 10 अर्ध शतके ठोकली आहे, पण एकदाही चेंडूला प्रेक्षकांपर्यंत पोहचवता आलं नाही. आपल्या कारकीर्दीत 1 शतक आणि 14 अर्धशतके ठोकणारा हा खेळाडू एकदिवसीय आणि कसोटीमध्ये एकदाही षटकार मारू शकला नाही, ही बाब सर्वांना आश्चर्यचकित करणारी आहे.
थिलान समरवीरा :
थिलान समरवीरा श्रीलंकेसाठी सातत्याने धावा काढणाऱ्या खेळाडूंपैकी एक होता. कसोटी कारकीर्दीत त्याने आपल्या संघासाठी उत्तम कामगिरी केली होती. एकदिवसीय कारकीर्दीत त्याने 53 सामने श्रीलंका संघासाठी खेळले आणि दोन शतकंही ठोकले. पण षटकार एकदाही तो मारू शकला नाही.
मनोज प्रभाकर :
अष्टपैलू खेळाडू म्हणून मनोज प्रभाकर भारतीय संघाकडून खेळायचे. 12 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी भारताकडून 130 एकदिवसीय सामने खेळले. 2 शतक आणि 11 अर्धशतकं झळकवल्यानंतरही आपल्या एकदिवसीय कारकीर्दीत ते एक वेळेसही षटकार मारू शकले नाही. एवढे सामने खेळूनही एक षटकार मारू न शकणे हे आश्चर्यकारक आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
कसोटीत दोनवेळा त्रिशतकं झळकावत आपल्या नावाचा डंका वाजवणारे ४ फलंदाज
भारताकडून ९० पेक्षाही अधिक सामने खेळले, परंतु एकदाही षटकार मारता न आलेले २ क्रिकेटर
आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पणात शुन्यावर बाद झालेले तीन भारतीय क्रिकेटर; एमएस धोनीचाही आहे समावेश