---Advertisement---

कसोटीत दोनवेळा त्रिशतकं झळकावत आपल्या नावाचा डंका वाजवणारे ४ फलंदाज

On: बुधवार, जुलै 28, 2021 8:11 AM
VIRENDER-SEHWAG
---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कसोटी हे पहिले स्वरूप होते आणि त्याकाळात ते खुप लोकप्रिय होते. कसोटी क्रिकेट पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्याही त्यावेळी बऱ्या प्रमाणात असायची. अलिकडे एकदिवसीय आणि टी20 क्रिकेट आल्यानंतरही कसोटी क्रिकेटची एक वेगळी ओळख टिकून आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये असे काही महान खेळाडू झाले आहेत, ज्यांच्या दमदार फलंदाजीने अनेकांची मने जिंकली आणि त्यांनी नावेही कमावली. त्यातही असे काही फलंदाज होऊन गेले आहेत, ज्यांना एकपेक्षा अधिकवेळा कसोटीत त्रिशतकं ठोकली आहेत. एखाद्या खेळाडूसाठी शतकी किंवा द्विशतकी खेळी करणेही मोठी गोष्ट असते, असे असताना एकापेक्षा अधिकवेळा त्रिशतक करण्याचा कारणामा फार कमी फलंदाजांच्याबाबतीत पाहायला मिळाला आहे.

अशाच चार फलंदाजांची चर्चा या लेखात केली आहे, ज्यांनी कसोटीत दोन वेळेस तिहेरी शतक ठोकले आहे.

डॉन ब्रॅडमन :
ऑस्ट्रेलियातून येणाऱ्या डॉन ब्रॅडमन या खेळाडूने कसोटी क्रिकेटमध्ये नविन परिमाण निर्माण केले. आपल्या कसोटी कारकीर्दीत दोन तिहेरी शतक ठोकले. विशेष म्हणजे त्यांनी दोन्ही त्रिशतकं इंग्लंडच्या विरोधात केले होते. याने हेंडिग्ले येथे 1930 साली 334 धावा काढल्या होत्या.
यानंतरही त्याच मैदानावर 1934 मध्ये 304 धावांची खेळी खेळली होती.

ब्रायन लारा :
वेस्ट इंडिजच्या ब्रायन लारा या खेळाडूची कोणत्याही परिचयाची गरज नाही. याने आपली दोनही तिहेरी शतक अँटिग्वामध्ये बनवली. विशेष म्हणजे ब्रॅडमनप्रमाणेच याच्याही समोर इंग्लंडचा संघ होता. त्याने 1994 साली 375 धावा केल्या. हा विक्रम अनेक वर्ष कायम राहिला. नंतर मॅथू हेडनने तोडला. यानंतर 2004 सालामध्ये लाराने नाबाद 400 धावा करत पुन्हा एकदा कसोटी सर्वोच्च धावांची खेळी करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला.

विरेंद्र सेहवाग :
भारताचा सलामीवीर फलंदाज म्हणून खूप मोठे नाव कमावलेल्या विरेंद्र सेहवागनेही त्याच्या कारकिर्दीत २ वेळा त्रिशतक केले आहे. विशेष म्हणजे भारताकडून पहिले तिहेरी शतक विरेंद्र सेहवागनेच ठोकले होते. सेहवागने 2004 मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर असताना मुल्तानमध्ये 309 धावा केल्या होत्या. यानंतर त्याने 2008 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात 319 धावा केल्या होत्या.

ख्रिस गेल :
ब्रायन लारा नंतर वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल हा खेळाडू आहे, ज्याने दोनदा तिहेरी शतक ठोकले. गेलने 2005 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात 317 धावा केल्या होत्या. यानंतर त्याने 2010 मध्ये श्रीलंकेच्या विरोधात गॉल कसोटीत 333 धावांची खेळी खेळली होती.

महत्त्वाच्या बातम्या – 

भारताकडून ९० पेक्षाही अधिक सामने खेळले, परंतु एकदाही षटकार मारता न आलेले २ क्रिकेटर

आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पणात शुन्यावर बाद झालेले तीन भारतीय क्रिकेटर; एमएस धोनीचाही आहे समावेश

वनडे मालिकेवर ऑस्ट्रेलियाची मोहोर, वेस्ट इंडिजचा तिसऱ्या वनडेत ६ विकेट्स केला पराभव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---