आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक मोठी नावे आहेत आणि अनेक गोलंदाजांनी आपल्या क्षेत्रात चांगली कामगिरीही केली आहे. फलंदाजांनी अनेकदा गोलंदाजीतपण आपले हात आजमावले आहेत, तर गोलंदाजांनीही अनेक वेळा मैदानावर आपल्या फलंदाजीचे कौशल्य दाखवले आहेत. या सर्वांमध्ये षटकार आणि चौकार लगावणाऱ्या खेळाडूंना वेगळे महत्त्व आहे.
रोहित शर्मा, ख्रिस गेल, डिविलियर्ससारखे खेळाडू षटकारासाठी ओळखले जातात. खालच्या फळीत फलंदाजी करताना गोलंदाजही अनेकदा षटकार मारताना दिसले आहेत. भारतासाठी झहीर खान, श्रीनाथ, उमेश यादव, हरभजन सिंग हे असे अनेकदा मोठे फटके मारताना दिसले आहेत.
पण आश्चर्यची बाब ही आहे की, असेही दोन भारतीय खेळाडू आहेत, ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही वेळा षटकार मारला नाही. विशेष म्हणजे त्यांनी भारताकडून ९० पेक्षाही अधिक सामने खेळले आहेत.
युजवेंद्र चहल :
युजवेंद्र चहलने 2016 मध्ये भारताकडून एकदिवसीय क्रिकेट सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून ते आतापर्यंत चहलला फलंदाजीसाठी मिळालेल्या संधीत तो एकदाही षटकार मारू शकला नाही. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत 11 चेंडू खळले आहेत, तसेच एक दिवसीय सामन्यात 90 चेंडूचा सामना केला आहे. पण अद्यापही त्याच्या हातून षटकार मारण्याची प्रतिक्षा आहे. आणखी एक विशेष बाब म्हणजे चहलने लिस्ट ए आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मिळून एकूण तीन षटकार लगावले आहेत. चहलने आत्तापर्यंत 105 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
कुलदीप यादव :
चायनामन गोलंदाज कुलदीप यादव भारताकडून कसोटी, एकदिवसीय आणि टी20 क्रिकेट सामने खेळला आहे. कसोटी सामन्यामधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या कुलदीप यादवने आतापर्यंत एकही षटकार मारलेला नाही. कसोटीत त्याने 185 चेंडूचा सामना केला आहे, एकदिवसीयमध्ये 188 तर टी20 मध्ये 20 चेंडू त्याने खेळले आहेत. मात्र,आतापर्यंत एकही षटकार त्याने मारलेला नाही. त्याने तीनही स्वरूपात मिळून 93 सामने खेळले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पणात शुन्यावर बाद झालेले तीन भारतीय क्रिकेटर; एमएस धोनीचाही आहे समावेश
वनडे मालिकेवर ऑस्ट्रेलियाची मोहोर, वेस्ट इंडिजचा तिसऱ्या वनडेत ६ विकेट्स केला पराभव
अरर! चक्क बेन स्टोक्सकडून झाली चूक, बाऊंड्री लाईनवर झेलही सुटला अन् संघाने सामनाही गमावला