सध्या द हंड्रेड स्पर्धेचे सामने सुरू आहेत. या स्पर्धेमध्ये ट्रेंट रॉकेट्स आणि नोर्थरन सुपरचार्जर्स या संघामध्ये सामना झाला. या संघात झालेल्या सामन्यात ट्रेंट रॉकेट्सने हा सामना २ गडी राखून जिंकला आहे. हा सामना सुरू असताना असे वाटत होते की, हा सामना ट्रेंट रॉकेट्स संघ हारेल. परंतु, या संघाचा सलामीवीर फलंदाज एलेक्स हेल्स शेवटपर्यंत मैदानावर टिकून राहिला आणि संघाला विजय मिळवून दिला. या सलामीवीर फलंदाजाने सामन्याच्या ९४ व्या चेंडूवर षटकार लगावत संघाला विजय मिळवून दिला.
विशेष म्हणजे या सामन्यादरम्यान सुपरचार्जर्स संघाचा कर्णधार बेन स्टोक्सने हेल्सचा सोपा झेल सोडला होता. या सामन्याच्या ७७ व्या चेंडूवर हे दृश्य पाहायला मिळाले होते. जेव्हा हेल्सने आदिल रशीदच्या चेंडूवर मोठा शॉट लावण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा हा चेंडू हेल्सच्या बॅटवर व्यवस्थित आला नव्हता. तरीही हा शॉट सीमारेषेच्या दिशेने गेला. सीमारेषेवर उभारलेला बेन स्टोक्स हा झेल अगदी सहज पकडू शकेल असे वाटत होते. परंतु, स्टोक्सच्या हातून हा झेल सुटला. इतकेच नव्हे तर हेल्सच्या खात्यात ६ धावांची भार पडली.
https://twitter.com/thehundred/status/1419749997671768067
नोर्थरन सुपरचार्जर्स संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करत सर्वबाद १३२ अशी धावसंख्या उभारली. यानंतर फलंदाजी करण्यास मैदानावर उतरलेल्या ट्रेंट रॉकेट्स संघाचे या सामन्यात ८ गडी बाद झाले होते. तर, सुपरचार्जर्स संघाने दिलेले १३४ धावांचे आव्हान ट्रेंट रॉकेट्स संघाने ९४ चेंडूत पूर्ण केले.
द हंड्रेड या स्पर्धेमध्ये एक डाव फक्त १०० चेंडूंचा असतो. त्याचबरोबर या सामन्यातील एक षटक ५ चेंडूंचा असतो. या स्पर्धेचे नियम हे नियमित खेळल्या जाणाऱ्या क्रिकेटच्या नियमांपेक्षा थोडे वेगळे आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
अवघ्या १९ वर्षीय दीप्तिच्या मदतीसाठी धावला ‘मास्टर ब्लास्टर’, डॉक्टर बनण्यासाठी करणार मदत
कृणाल पंड्याच्या संपर्कात आलेल्या ८ खेळाडूंची झाली आरटी-पीसीआर टेस्ट, पाहा काय आला अहवाल
इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेआधी रिषभ आणि शार्दुलच्या संघात रंगला ‘अजब’ सामना