---Advertisement---

अवघ्या १९ वर्षीय दीप्तिच्या मदतीसाठी धावला ‘मास्टर ब्लास्टर’, डॉक्टर बनण्यासाठी करणार मदत

On: बुधवार, जुलै 28, 2021 12:17 AM
Sachin-Tendulkar
---Advertisement---

भारतीय संघाचा दिग्गज क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनी क्रिकेट कारकिर्दीत अनेक विक्रम केले आहेत. यांच्या व्यतिरिक्त सचिन तेंडुलकरने सामाजिक कार्य देखील केले आहे. असेच एक सामाजिक कार्य करण्यासाठी सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा पुढे आला आहे.

तो रत्नागिरी जिल्ह्यातील जारे गावातले आणि १९ वर्षीय दीप्ती विश्वासराव हिच्या मदतीसाठी पुढे आला आहे. त्याच बरोबर सचिन तेंडुलकरच्या मदतीने ती आपल्या गावातील पहिली महिला डॉक्टर बनण्याची तयारी करत आहे. दीप्ती नेहमीच गुणवंत विद्यार्थीपैकी एक होती आणि लहानपणापासूनच डॉक्टर होण्याचे तिचे स्वप्न आहे. परंतु, तिच्यासाठी हे ध्येय गाठणे कधीच सोपे नव्हते.

भारतामध्ये कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन केले होते. याच दरम्यान ऑनलाइन अभ्यास सुरू ठेवण्यासाठी ती रोज खेड्यातून एक किलोमीटरचा प्रवास करत होती. दीप्तीच्या याच मेहनतीचे फळ तिला मिळाले आहे. दीप्ती एनईईटी या परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे. त्याचबरोबर तिला अकोला येथील सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आहे.

दीप्तीला मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश तर मिळाला परंतु, आर्थिक अडचणी दीप्तीची पाठ सोडत नव्हत्या. मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेऊनही वडिलांच्या कमी उत्पन्नामुळे तिला फी व इतर खर्च परवडत नव्हता. दीप्तीच्या नातेवाईकांनी फी भरण्यासाठी हातभार लावला, पण तरीही तिला वसतिगृह व इतर खर्चासाठी पैसे कमी पडत होते.

जेव्हा ती डॉक्टर होण्याच्या स्वप्नापासून दूर जात होती, त्याचवेळी सचिन तेंडुलकर पुढे आले आणि सेवा सहयोग फाऊंडेशन (एसएसएफ) च्या मदतीने पाठिंबा दिला. त्यामुळे दीप्ती तिची स्वप्ने पूर्ण करू शकेल आणि आपल्या गावातील पहिली कन्या डॉक्टर होण्याची तिची इच्छा पूर्ण होईल.

एसएसएफच्या ट्विटर हँडलवरून व्हिडिओच्या माध्यमातून दीप्ती म्हणाली की, ‘सचिन तेंडुलकर आणि फाउंडेशनच्या मदतीने मला शिष्यवृत्ती मिळाली आहे. त्यासाठी मी खूप खूप आभारी आहे. शिष्यवृत्तीमुळे मला आर्थिक मदत मिळाली आहे. या शिष्यवृत्तीमुळे मी माझ्या अभ्यासावर जास्त लक्ष केंद्रित करू शकेन. अकोला येथील सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर होण्याचे माझे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. मी वचन देते की, मी डॉक्टर होण्यासाठी खूप कष्ट करीन आणि एक दिवस मी इतर हुशार विद्यार्थ्यांना मदत करेन, जसे सचिन तेंडुलकर आणि फाउंडेशनने मला मदत केली आहे.’

दुर्गम खेड्यात तिच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान असूनही सचिन तेंडुलकर आणि एसएसएफ अधिकाऱ्यांच्या सोबत मिळून कमी कालावधीमध्ये आवश्यक निधीची व्यवस्था केली. दीप्ती ही सचिन तेंडुलकरच्या सुविधा आणि विद्यार्थी विकास योजना एसएसएफचा प्रकल्प या माध्यमातून मिळणार्‍या अनेक लाभार्थ्यांपैकी एक आहे. हा प्रकल्प समाजातील वंचित घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक सहाय्य करण्याच्या दिशेने कार्य करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

कृणाल पंड्याच्या संपर्कात आलेल्या ८ खेळाडूंची झाली आरटी-पीसीआर टेस्ट, पाहा काय आला अहवाल

इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेआधी रिषभ आणि शार्दुलच्या संघात रंगला ‘अजब’ सामना

धोनी-अय्यर दिसले फुटबॉल खेळताना, विराटने इंग्लंडवरून केली ‘ही’ मागणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---