---Advertisement---

धोनी-अय्यर दिसले फुटबॉल खेळताना, विराटने इंग्लंडवरून केली ‘ही’ मागणी

On: मंगळवार, जुलै 27, 2021 11:29 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा युवा व मधल्या फळीतील विश्वासू फलंदाज श्रेयस अय्यर सध्या खांद्याच्या दुखापतीतून सावरत आहे. तो काही अंशी बरा झाला असला तरी, अधिकची जोखीम नको म्हणून त्याला श्रीलंका दौऱ्यावर पाठवण्यात आले नव्हते. परंतु, नुकतेच त्याला एका चॅरिटी फुटबॉल सामन्यासाठीची तयारी करताना पाहिले गेले. या सरावा दरम्यानची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहलीने त्याला मजेदार उत्तर दिले.

सेलिब्रेटींचा होणार फुटबॉल सामना
मुंबई येथे काही दिवसानंतर सेलिब्रिटींचा एक चॅरिटी फुटबॉल सामना खेळला जाईल. या सामन्यामध्ये काही क्रिकेटपटू आणि सिनेअभिनेते खेळताना दिसतील. ज्यामध्ये भारताचा माजी क्रिकेट कर्णधार एमएस धोनी, श्रेयस अय्यर तसेच केदार जाधव यांसारखे क्रिकेटपटू दिसून येतील. तर, अभिनेत्यांच्या संघामध्ये रणवीर सिंग, करण वाही, शब्बिर अहलुवलिया हे खेळताना दिसतील. सध्या हे सर्व सेलिब्रिटी अंधेरी येथे सराव करत आहेत.

श्रेयसने शेअर केली छायाचित्रे
या सामन्यासाठीच्या सराव सत्राची काही छायाचित्रे श्रेयसने आपल्या इंस्टाग्राम खात्यावरून पोस्ट केली. ज्यामध्ये तो धोनी व रणवीर सिंग यांच्यासोबत सराव करताना दिसत आहे. त्याने या पोस्टला ‘बॅलिन विथ दिस बॉलर्स’ असे कॅप्शन दिले.

https://www.instagram.com/p/CRyeA0NLriY/

त्यावर प्रतिक्रिया देताना भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने लिहिले, ‘जेव्हा मी शहरात असेल तेव्हा, मलादेखील तुमच्याबरोबर खेळेल.’ यावर श्रेयसने ‘लेफ्ट विंगर’ असे उत्तर दिले. विराट कोहली सध्या भारतीय संघासह इंग्लंडमध्ये कसोटी सामन्याची तयारी करत आहे.

Photo Courtesy: Instagram/Shreyas Iyer

इंग्लंडविरुद्ध झाली होती दुखापत
चालू वर्षी मार्च महिन्यात इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेदरम्यान अय्यरला मैदानात क्षेत्ररक्षण करताना दुखापत झालेली. दवाखान्यात दाखल केल्यानंतर त्याचा खांदा निखळल्याचे निदान झाले होते. या दुखापतीमुळे दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार असलेला श्रेयस आयपीएल २०२१ चा पहिला टप्पा खेळू शकला नव्हता. युएईमध्ये होणाऱ्या आयपीएलच्या उर्वरित हंगामात तो पुन्हा एकदा संघाचे नेतृत्व करताना दिसेल.

महत्त्वाच्या बातम्या – 

कृणाल कोरोनाबाधित आढळल्याने चिंतेत पडली इंग्लंडमधील ‘विराटसेना’, ‘हे’ आहे कारण

‘कृणाल पंड्याने एकहाती मालिका संपवली’, दुसरा टी२० सामना पुढे ढकलल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

“मी चुकांमधून शिकलोय”, इंग्लंड दौऱ्यावर पुनरागमन करणाऱ्या खेळाडूने व्यक्त केल्या भावना

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---