---Advertisement---

‘कृणाल पंड्याने एकहाती मालिका संपवली’, दुसरा टी२० सामना पुढे ढकलल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

---Advertisement---

श्रीलंका आणि भारत यांच्या दरम्यान कोलंबो येथे टी२० मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिला सामना जिंकून भारतीय संघाने १-० अशी आघाडी मिळवली असून, मालिकेतील दुसरा सामना मंगळवारी (२७ जुलै) खेळविला जाणार होता. मात्र, भारतीय संघाचा अष्टपैलू कृणाल पंड्या हा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने हा सामना एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. कृणाल कोरोनाबाधित असल्याचे वृत्त आल्यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावरून अनेक मजेदार प्रतिक्रिया देत कृणालला ट्रोल केले.

चाहत्यांनी केले कृणालला ट्रोल
तीन सामन्यांच्या टी२० मालिकेतील दुसरा सामना अचानकपणे रद्द करण्यात आल्याने चाहत्यांनी कृणाल पंड्याला चांगलेच धारेवर धरले. एका चाहत्याने ट्विट करताना कृणालने श्रीलंकेच्या खेळाडूला मिठी मारलेले एक छायाचित्र शेअर करताना लिहिले, ‘कृणालसोबत श्रीलंकेचे खेळाडू सुद्धा सुरक्षित नाहीत.’

अन्य काही चाहत्यांनी कृणालच्या एका प्रसिद्ध हावभावाचे छायाचित्र शेअर करताना अनेक मजेदार कमेंट केल्या.

 

https://twitter.com/BihariRozer/status/1419979918822100997

https://twitter.com/Hmka_join_krlo/status/1419979938640265221

कृणालमुळे भारतीय खेळाडू झाले क्वारंटाईन
दुसरा टी२० सामना सुरु होण्यास काही तासांचा अवधी शिल्लक असताना कृणाल पंड्या कोरोनाबाधित आढळल्याने खळबळ उडाली. कृणालच्या संपर्कात आलेल्या आठ भारतीय खेळाडूंना क्वारंटाईन व्हावे लागले. सूर्यकुमार यादव व पृथ्वी शॉ हे इंग्लंड दौऱ्यावर जाणारे खेळाडू देखील यामध्ये सामील आहेत. सर्व खेळाडूंची आरटी-पीसीआर टेस्ट केल्यानंतर हा सामना खेळविला जाणार का याबाबत निर्णय घेतला जाईल. आणखी भारतीय खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास ही मालिका रद्द देखील केली जाऊ शकते.

महत्त्वाच्या बातम्या – 

“मी चुकांमधून शिकलोय”, इंग्लंड दौऱ्यावर पुनरागमन करणाऱ्या खेळाडूने व्यक्त केल्या भावना

इंग्लंडमध्ये कसोटीतही होणार का सूर्यकुमारचा ‘उदय’? ‘या’ ३ खेळाडूंच्या ऐवजी मिळू शकते ‘प्लेइंग इलेव्हन’मध्ये संधी

‘हे’ ३ विकेटकीपर पंतसाठी आहेत धोक्याची घंटा! यष्टीपुढे अन् यष्टीमागे प्रदर्शनात आहेत त्याच्या बरोबरीचे

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---