आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांनी आपल्या कारकिर्दीत खूप नाव कमावले. तत्पूर्वी या बातमीद्वारे आपण तीन सर्वात धोकादायक फलंदाजांबद्दल जाणून घेऊया. ज्यांनी गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. पण त्यांच्या उत्कृष्ट कसोटी कारकिर्दीत त्यांच्या नावावर एक खराब रेकाॅर्ड आहे.
ऑस्ट्रेलियाचा ॲडम गिलख्रिस्ट (Adam Gilchrist), ट्रेव्हिस हेड (Travis Head) आणि भारताचा वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) यांचा या यादीत समावेश आहे. या तिन्ही खेळाडूंनी आपल्या कारकिर्दीत धुमाकूळ घातला आणि प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवले. खूप धावा आणि शतके झळकावली, पण शून्यावर बाद होणे हा लाजिरवाणा रेकाॅर्ड या तिघांच्याही कारकिर्दीवर आहे.
या तिन्ही दिग्गज खेळाडूंच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये ‘किंग पेअर’ नावाचा रेकाॅर्ड आहे. याचा अर्थ कसोटीच्या दोन्ही डावातील पहिल्याच चेंडूवर बाद होणे असा आहे. 2001 साली भारताविरुद्ध खेळताना ॲडम गिलख्रिस्ट कसोटीच्या दोन्ही डावात पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता. तो पहिल्या डावात हरभजन सिंग (Harbhajan Singh) आणि दुसऱ्या डावात सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) त्याला एलबीडब्ल्यू बाद केले होते.
सध्या ऑस्ट्रेलियन संघात असलेला विस्फोटक फलंदाज ट्रेव्हिस हेड (Travis Head) सोबतही अशीच स्थिती झाली आहे. जानेवारी 2024 मध्ये हेडने वेस्ट इंडिजविरुद्ध ‘किंग पेअर’ रेकाॅर्ड आपल्या नावावर केला. पहिल्या डावात हेड झेलबाद झाला होता तर दुसऱ्या डावात क्लीन बोल्ड झाला.
2011 साली इंग्लंडविरुद्ध सेहवागही खाते न उघडता दोन्ही डावात तंबूत परतला होता. सामन्याच्या पहिल्या डावात वेगवान गोलंदाज ख्रिस ब्रॉडने पहिल्याच चेंडूवर सेहवागला यष्टिरक्षकाकडून झेलबाद केले. तर दुसऱ्या डावात जेम्स अँडरसनने सेहवागला हाती झेलबाद केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलमधून लवकरच निवृत्त होणार का धोनी? माजी खेळाडूचे मोठे वक्तव्य
“भारतावर भारी पडणार ऑस्ट्रेलिया…” बाॅर्डर-गावसकर ट्राॅफीपूर्वी दिग्गजाची मोठी भविष्यवाणी
मात्र 132 धावा दूर! भारताचा ‘हा’ स्टार फलंदाज करणार ‘विश्वविक्रम’