आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फिरकीपटू गोलंदाजांनी आपल्या फिरकीने अनेक कमाल केले आहेत. कदाचित याच कारणामुळे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत पहिल्या ३ क्रमांकावर फिरकीपटूंची नावे आहेत.
पण, पुर्वी हे असे नव्हते. कसोटी क्रिकेटच्या सुरुवातीच्या दशकात वेगवान गोलंदाजांची वेगळीच ओळख होती. वेस्ट इंडिजमध्ये त्यावेळी अनेक खतरनाक वेगवान गोलंदाज होते. त्यांचे चेंडू कानाजवळून जरी गेले तरी जोरचा आवाज यायचा. पुढे हळू-हळू क्रिकेटमध्ये अनेक बदल होत गेले आणि क्रिकेटला अनेक फिरकी गोलंदाज मिळाले. मात्र, त्यावेळीही वेगवान गोलंदाजांची कमतरता नव्हती.
वेगाने येणाऱ्या चेंडूचा सामना करणे मात्र फलंदाजांना बऱ्याचदा कठीण जाते. क्रिकेट विश्वात असे अनेक गोलंदाज होऊन गेले आहेत, ज्यांनी त्यांच्या वेगवान चेंडूने फलंदाजांच्या अंगावर काटा आणला आहे. त्यावेळी वेगाने चेंडू टाकाणे हेच त्यांचे पहिले लक्ष्य असायचे. कधी त्यांचा चेंडू दिशा भटकायचा तर कधी बरोबर यष्टीला जाऊन लागायचा.
या लेखात अशाच वेगवान गोलंदाजांचा आढावा घेण्यात आला आहे, ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने चेंडू टाकला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने चेंडू टाकणारे ३ गोलंदाज-
३. शॉन टेट-
ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज शॉन टेटने २००७मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आपल्या वेगवान गोलंदाजीने केलेल्या कारनाम्यामुळे त्याला लवकर प्रसिद्धी मिळाली होती. २०१०मध्ये इंग्लंडविरुद्धच्या वनडे सामन्यात शॉनने १६१.१ किमी दर ताशी वेगाने चेंडू टाकला होता. हा त्याचा सर्वात वेगाने टाकला गेलेला चेंडू होता.
सतत होणाऱ्या दुखापतींना कंटाळून शॉनने लवकरच क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने एकूण ९५ विकेट्स घेतल्या आहेत.
२. ब्रेट ली-
ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली सर्वांना परिचित आहे. आपल्या वेगवान चेंडूने त्यांने अनेक फलंदाजांना संकटात पाडले आहे. ब्रेट लीने त्याचा सर्वात वेगवान चेंडू २००५मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सामन्यात टाकला होता. त्यावेळीचा चेंडूचा वेग १६१.१ किमी दर ताशी इतका होता.
शिवाय २००३ सालच्या विश्वचषकात त्याने श्रीलंकेचा क्रिकेटपटू मर्वन अट्टापट्टूला १६० किमी दर ताशी वेगाने चेंडू टाकत त्रिफळाचीत केले होते.
१. शोएब अख्तर-
पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर हा सर्वात वेगाने चेंडू टाकणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांकावर आहे. त्याने २००३च्या वनडे विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध १६१.३ किमी तर ताशी वेगाने चेंडू टाकला होता.
हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वेगवान चेंडूच नव्हे तर, त्याबरोबर विश्वविक्रमही ठरला. त्याचा हा विश्वविक्रम अजूनही अबाधित आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
एकाच संघात एकाचवेळी खेळलेले टाॅप ५ स्पर्धक खेळाडू, जे आहेत चांगले मित्र
पदार्पणाच्या कसोटी मालिकेतच मॅन ऑफ द सिरीज ठरलेले ३ भारतीय खेळाडू, एक…
पोलार्ड, मलिंगा या परदेशी खेळाडूंशिवाय मुंबई इन्डियन्स असेल सर्वात…