आयपीएल सुरुवातीपासूनच उत्तम आयोजन आणि सामन्यांसाठी चर्चेत आहे. याशिवाय आयपीएल लोकप्रिय करण्यासाठी खेळाडू आणि संघांनीही परिश्रम घेतले आहेत. दरवर्षी प्रेक्षक आयपीएल स्पर्धेची प्रतीक्षा करत असतात. आयपीएल यशस्वी होण्यासाठी खेळाडूंव्यतिरिक्त प्रेक्षकांचेही मोठे योगदान आहे. विविध विक्रम आणि रोमांचक सामने हे आयपीएलचे वैशिष्ट्य ठरले आहेत. दरवर्षी असे बरेच सामने बघायला मिळतात ज्यांचा निर्णय हा शेवटच्या चेंडूवर ठरतो. शेवटच्या चेंडूवरच मुंबई इंडियन्सने दोन वेळा फायनल जिंकली आहे.
आयपीएलची आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे अनेक संघांनी लीग टप्प्यात उत्कृष्ट प्रदर्शन केले परंतु अंतिम सामान्यांपर्यंत पोहचू शकले नाहीत. ते जेतेपद मिळवण्यापासून दूर राहिले. तसेच बर्याच दिग्गजांनी जबरदस्त खेळ केला परंतु आवश्यक वेळी ते संघाला सावरू शकले नाहीत. बऱ्याचदा मोठी धावसंख्या उभारली, परंतु त्या धावसंख्येचा पाठलाग करून सामना जिंकणे सोपे नसते. याशिवाय आयपीएलमध्ये सर्वात कमी धावाही केल्या गेल्या. या लेखात आयपीएल मधील संघांनी केलेल्या मोठ्या धावसंख्येची माहिती आपण घेणार आहोत.
आयपीएलमध्ये सर्वात मोठी धावसंख्या उभारणारे हे ३ संघ-
३. चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings)
२०१० च्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध चेन्नई सुपर किंग्जने २४६ धावा केल्या. त्यात मुरली विजयने १२७ धावांची तुफानी खेळी केली होती. राजस्थान रॉयल्सनेही या धावसंख्येचा जबरदस्त पाठलाग केला परंतु या संघाने पाच विकेट्स गमावत २२३ धावाच केल्या आणि चेन्नईने हा सामना जिंकला. या सामन्याचा सामनावीर म्हणून मुरली विजयला घोषित करण्यात आले.
२. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore)
२०१६ च्या आयपीएलमध्ये आरसीबीने गुजरात लायन्सविरुद्ध २४८ धावा केल्या. विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स यांनी शानदार भागीदारी आणि शतके केली. त्यावेळी सुरेश रैना गुजरात लायन्सचा कर्णधार होता आणि लक्ष्याचा पाठलाग करताना त्याचा संघ १०४ धावांवर सर्व बाद झाला. आरसीबीने हा सामना मोठ्या फरकाने जिंकला. या सामन्यात ख्रिस जॉर्डनने ४ आणि युजवेंद्र चहलने ३ बळी घेतले.
१. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore)
२०१३ च्या आयपीएलमध्ये पुणे वॉरियर्स इंडियाविरुद्ध आरसीबीने ५ गड्यांच्या मोबदल्यात विक्रमी २६३ धावा केल्या. ही आतापर्यंतची सर्वोच्च संघाची धावसंख्या आहे. या सामन्यात ख्रिस गेलने नाबाद १७५ धावा केल्या, जी टी-२० क्रिकेटमधील वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या आहे. पुणे वॉरियर्स इंडिया संघाला ही धावसंख्या करता आली नाही आणि आरसीबीने १३० धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळविला.
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएलमध्ये सर्वाधिक सिक्सर मारणाऱ्या ५ फलंदाजांमध्ये पहिल्या दोन स्थानावर आहेत परदेशी क्रिकेटर
-आयपीएलमधील सर्वात वयस्कर मोहरे, ज्यांनी वयाला मागे टाकत केले कारनामे
-वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा पन्नासपेक्षा अधिक धावा करणारे अव्वल ३ भारतीय फलंदाज
महत्त्वाच्या बातम्या-
–आयपीएलची स्पॉन्सरशिप मिळवणं नाही सोप्पं, नुसते नियम ऐकून तुम्हाला येईल टेन्शन
-झिवाच्या मांडीवरील छोटा मुलगा पाहून चाहत्यांना पडला प्रश्न, काहींनी दिल्या धोनीला शुभेच्छा
-विराट कोहली म्हणजे कपडे घातलेला वाघ, संघसहकाऱ्याने केली विराटची थट्टा