वनडे क्रिकेटमध्ये भारतीय फलंदाजांचा खेळ खूप प्रभावी आहे आणि भारतीय फलंदाजांच्या नावावर बरेच विक्रमही आहेत. सचिन तेंडुलकर, युवराज सिंग, विराट कोहली आणि एमएस धोनीसह अनेक दिग्गज फलंदाजांनी वनडेमध्ये भारतासाठी चांगली कामगिरी केली आहे. याच कारणामुळे आणि अशा फलंदाजांमुळे भारतीय संघ देखील वनडे क्रिकेटमध्ये खूप यशस्वी झाला आहे. भारताने २ वेळा विश्वचषक जिंकली आहे.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरबद्दल बोललो तर वनडे क्रिकेटचे जवळपास सर्वच विक्रम त्याच्या नावावर आहेत. सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक शतके ठोकण्याच्या बाबतीत तो जगात आघाडीचा फलंदाज आहे. त्याचबरोबर भारतीय संघाचा सध्याचा कर्णधार विराट कोहलीही त्याच्या पावलावर पाऊल ठेऊन पुढे जात आहे. विराट कोहलीही वनडे क्रिकेटमध्ये अनेक विक्रम करत आहे आणि सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक शतकांचा आणि धावांचा विक्रम मोडेल असे बोलले जात आहे.
या लेखात त्या ३ भारतीय फलंदाजांविषयी जाणून घेऊ ज्यांनी वनडेमध्ये ११ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत.
वनडे क्रिकेटमध्ये ११ हजाराहून अधिक धावा करणारे ३ भारतीय खेळाडू
३. सौरव गांगुली (Sourav Ganguly)
माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली या यादीत तिसर्या क्रमांकावर आहे. गांगुली एक उत्तम कर्णधार होता आणि उत्कृष्ट डावखुरा फलंदाजही होता. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने २००३ च्या विश्वचषकात अंतिम फेरी गाठली होती. वनडे सामन्यात त्याने अनेक विक्रम केले आहेत. गांगुली पूर्वी सचिन तेंडुलकरबरोबर सलामीला जायचा, परंतु भारतीय संघामध्ये सेहवागचे आगमन झाल्यानंतर त्याने तिसर्या क्रमांकावर खेळण्यास सुरवात केली.
सचिनबरोबर सलामीची जोडी म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम अजूनही त्याच्या नावावर आहे. सौरव गांगुलीने वनडे कारकीर्दीत एकूण ३०८ सामने खेळले आणि ४०.९५ च्या सरासरीने ११२२१ धावा केल्या. त्याने वनडे कारकीर्दीत २२ शतके केली. तसेच तो उत्तम गोलंदाजीचीही करायचा.
२. विराट कोहली (Virat Kohli)
या यादीत दुसर्या क्रमांकावर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आहे. त्याने ही कामगिरी फारच कमी सामन्यांमध्ये केली आहे. विराट कोहली सातत्याने चांगली कामगिरी करत आहे आणि म्हणूनच तो या क्षणी वनडेमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू आहे.
विराट कोहलीने आतापर्यंतच्या वनडे कारकीर्दीत एकूण २४८ सामने खेळले असून त्यातील २३९ डावांमध्ये ५९.३३ च्या प्रभावी सरासरीने ११८६७ धावा केल्या. त्याने वनडे कारकीर्दीत आत्तापर्यंत ४३ शतके आणि ५८ अर्धशतके ठोकली आहेत. सध्या तो खेळात असून अजून किंक्रामी धावा करू शकतो.
१. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar)
सचिन तेंडुलकरच्या नावावर जवळपास वनडेतील सर्व विक्रम आहेत. सर्वाधिक सामने खेळण्याचा, सर्वाधिक धावा आणि शतके ठोकण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. सचिनने वनडे कारकीर्दीत एकूण ४६३ सामने खेळले आणि ४४.८३ च्या सरासरीने १८४२६ धावा केल्या. या दरम्यान त्याने ४९ शतके आणि ९६ अर्धशतके झळकावली आहेत.
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएलमध्ये सर्वाधिक सिक्सर मारणाऱ्या ५ फलंदाजांमध्ये पहिल्या दोन स्थानावर आहेत परदेशी क्रिकेटर
-आयपीएलमधील सर्वात वयस्कर मोहरे, ज्यांनी वयाला मागे टाकत केले कारनामे
-वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा पन्नासपेक्षा अधिक धावा करणारे अव्वल ३ भारतीय फलंदाज
महत्त्वाच्या बातम्या-
–आयपीएलची स्पॉन्सरशिप मिळवणं नाही सोप्पं, नुसते नियम ऐकून तुम्हाला येईल टेन्शन
-झिवाच्या मांडीवरील छोटा मुलगा पाहून चाहत्यांना पडला प्रश्न, काहींनी दिल्या धोनीला शुभेच्छा
-विराट कोहली म्हणजे कपडे घातलेला वाघ, संघसहकाऱ्याने केली विराटची थट्टा