-नितीन पिंगळे
आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वचषकामध्ये आपल्या संघाकडून खेळणं हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. भारतीय संघात कौशल्याची कमी नाही, अगदी देशांतर्गत क्रिकेटपासून राष्ट्रीय क्रिकेटपर्यंत भारतीय संघात अनेक प्रतिभावान खेळाडू आहेत. विश्वचषकामध्ये खेळणं ही प्रत्येक खेळाडूसाठी खास गोष्ट असते. पण विश्वचषकामध्ये सर्वांना खेळण्याची संधी मिळत नाही.
जेव्हा विश्वचषकामध्ये खेळाडू सर्वात जास्त धावा बनवतो किंवा विकेट्स घेतो, तेव्हा त्याला ‘गोल्डन बॅट’ किंवा ‘गोल्डन बॉल’ मिळतो. भारतीय संघात असे खेळाडू होऊन गेले, ज्यांनी विश्वचषकामध्ये आपल्या प्रदर्शनाने सर्वांना चकीत करून टाकलं आहे.
भारतीय क्रिकेट संघाने आतापर्यंत दोनवेळा आयसीसीचा (६० षटकांचा एकदा व ५० षटकांचा एकदा) विश्वचषक जिंकला आहे. या व्यतिरिक्त संघाला अंतिम सामन्यात हार देखील पत्करावी लागली आहे.
असे असले तरी अनेक संधी मिळाल्यावर खेळाडूने सर्वात जास्त धावा बनवून देशाचं नाव उज्ज्वल केलं आहे.
अशाच त्या तीन भारतीय खेळाडूंविषयी चर्चा आपण या लेखात करणार आहोत, ज्यांनी विश्वचषकामध्ये सर्वात जास्त धावा बनवून ‘गोल्डन बॅट’ (Golden Bat) जिंकली आहे.
विश्वचषकात गोल्डन बॅट मिळवणारे 3 खेळाडू- 3 Indian Batsmen Won the Golden Bat in World Cup
सचिन तेंडुलकर
मास्टर ब्लास्टर म्हणून सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) ओळखल जातं. क्रिकेटमध्ये अनेक विक्रम त्याच्या नावे आहेत. असाच एक विक्रम त्याने 1996 च्या विश्वचषकामध्ये केला होता. त्याने 7 सामन्यांत सर्वाधिक 523 धावा बनवल्या होत्या. त्यादरम्यान त्याने 2 शतकं आणि 3 अर्धशतक ठोकली होती. त्यामुळे पहिल्यांदाच कोणत्याही भारतीय फलंदाजाने विश्वचषकामध्ये ‘गोल्डन बॅट’ (Golden Bat) जिंकली होती.
सचिनलाच २००३ क्रिकेट विश्वचषकात गोल्डन बॅट मिळाली होती. ११ सामन्यात खेळताना ६१.१८च्या सचिनने या विश्वचषकात सर्वाधिक ६७३ धावा केल्या होत्या. तो या स्पर्धेत प्लेअर द टुर्नामेंट व गोल्डन बॅटचा मानकरी ठरला होता. या स्पर्धेत दोन वेळा सर्वाधिक धावा करणारा सचिन एकमेव खेळाडू आहे. व याचमुळे या स्पर्धेत दोन वेळा गोल्डन बॅट मिळविणारा तो एकमेव फलंदाज आहे.
राहुल द्रविड
कसोटी क्रिकेटमध्ये ‘द वॉल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहुल द्रविडने (Rahul Dravid) वनडे क्रिकेटमध्ये जबरदस्त प्रदर्शन केलं आहे. हळू- हळू कधी त्याच्या पन्नास धावा पूर्ण व्हायच्या कळत नव्हतं. द्रविडने 1999 च्या विश्वचषकामध्ये ‘गोल्डन बॅट’ मिळाली होती. त्याने 8 सामन्यात 461 धाव केल्या होत्या. त्याची 145 ही सर्वाधिक धावसंख्या होती.
रोहित शर्मा
भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) या खेळाडूला क्रिकेट विश्वात कोण ओळखत नाही, असं नाही. रोहितनं इंग्लंडमध्ये झालेल्या 2019 विश्वचषकामध्ये विरोधी संघांच्या नाकीनऊ आणले होत. यामध्ये त्याने 9 सामन्यांमध्ये 648 धावा केल्या होत्या. त्यात त्याने 5 शतकं आणि एक अर्धशतक ठोकले होते आणि त्याच्या या कामगिरीमुळेच त्याला ‘गोल्डन बॅट’ मिळाली होती.
ट्रेंडिंग घडामोडी-
-‘कॅप्टन कूल’ धोनीच्या नेतृत्वात निवृत्ती घेणारे टीम इंडियाचे ३ दिग्गज खेळाडू
-भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! या दिवसापासून पाहणार विराट- रोहितला मैदानावर
-मजदूरांना अन्न पुरवण्यासाठी या भारतीय गोलंदाजांने लावला घराबाहेर स्टॉल