---Advertisement---

सर्वाधिक वेळा ऑस्ट्रेलियाचे चार गडी गारद करणारे ३ भारतीय गोलंदाज, एका दिग्गजाचाही समावेश

On: मंगळवार, नोव्हेंबर 24, 2020 11:01 PM
---Advertisement---

क्रिकेटच्या सर्व स्वरूपात गोलंदाजांचे स्वतःचे खास स्थान आहे. फक्त फलंदाजांच्या बळावर एखादा संघ सामना जिंकू शकत नाही. संघात चांगले गोलंदाज असल्याशिवाय कोणताही संघ यशस्वी होऊ शकत नाही. ज्या संघाचे गोलंदाज चांगले आहेत, तोच संघ यशस्वी होत असतो. चांगले गोलंदाज बळी मिळवण्यात आणि धावा रोखण्यात पारंगत असतात. एखादेवेळी फलंदाज मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरले, तरी उत्कृष्ट गोलंदाज सामना जिंकून देऊ शकतात. भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर असून, दोन्ही संघांमध्ये काही दर्जेदार गोलंदाज आहेत.

सध्याच्या घडीला भारताकडे जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहेत. भारतीय संघाला या दौऱ्यामध्ये, संस्मरणीय कामगिरी करायची असेल तर, गोलंदाजांची भूमिका खूप महत्वाची ठरणार आहे. यापूर्वी, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील गोलंदाजी आक्रमणात नेहमीच तफावत राहिली आहे आणि हीच तफावत ऑस्ट्रेलियाच्या आतापर्यंतच्या यशाचे रहस्य आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सामन्यांमध्ये अनेक भारतीय गोलंदाजांनीही उत्तम कामगिरी करत, सामने जिंकवले आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानच्या वनडे सामन्यांत ऑस्ट्रेलियाच्या ब्रेट ली याने सर्वाधिक वेळा चार बळी मिळवण्याची कामगिरी केली आहे. ब्रेट लीने ४ वेळा ४ बळी घेण्याचा पराक्रम केला होता.

आज आपण, अशा तीन भारतीय गोलंदाजांविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध एका वनडे सामन्यात ४ बळी मिळवण्याची कामगिरी एकाहून जास्त वेळा केली आहे.

३. उमेश यादव

भारताकडून एकाच वेळी तिन्ही प्रकारच्या संघात खेळणारा उमेश यादव सध्या भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाचा नियमित सदस्य नाही. उमेश सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयशी ठरला आणि त्याचा फटका त्याला सहन करावा लागला. सध्या भारताच्या कसोटी संघाचा प्रमुख गोलंदाज असलेल्या उमेशने आतापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ११ वनडे सामने खेळले आहेत. या ११ सामन्यात त्याने एकूण ९९.५ षटके गोलंदाजी केली आहे. त्याच्या खात्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध २१ बळींची नोंद आहे. ७१ धावा देऊन ४ बळी ही त्याची ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वोत्कृष्ट गोलंदाजी कामगिरी राहिली.

२. इशांत शर्मा

भारतीय वेगवान गोलंदाज इशांत शर्माने आपल्या वनडे कारकीर्दीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध १८ वनडे सामने खेळले आहेत. इशांत सध्या भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाचा सदस्य नाही. मात्र, काही वर्षांपूर्वी तो वनडे संघाचा प्रमुख गोलंदाज होता. इशांतने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १८ वनडे सामन्यांमध्ये एकूण २६ बळी मिळवले असून, यावेळी त्याने दोनदा ४ बळी घेण्याची कामगिरी केली आहे. इशांतची ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वोत्तम गोलंदाजीची कामगिरी ३८ धावा देऊन ४ बळी अशी राहिली आहे.

१. अजित आगरकर

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गोलंदाजांमध्ये मुंबईकर अजित आगरकरचा समावेश आहे. आगरकरने आपल्या स्विंग गोलंदाजीने जगभरातील फलंदाजांना नाकीनऊ आणले होते. आगरकर ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे सामन्यात भारताचा दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. आगरकरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २१ सामन्यांत ३६ बळी घेतले आहेत. त्याने वनडे कारकिर्दीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताकडून सर्वाधिक ३ वेळा ४ बळी मिळवण्याची कामगिरी केली आहे.

ट्रेंडिंग लेख-

टीम इंडियाचं हे ‘त्रिकुट’ उडवू शकतं ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या सर्वाधिक दांड्या

श्वास रोखून धरा! आगामी वनडे मालिकेत ‘हे’ तीन भारतीय पाडू शकतात धावांचा पाऊस

बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध एका वनडेत सर्वाधिक षटकार ठोकणारे ३ भारतीय फलंदाज, दुसरे नाव अनपेक्षित

महत्त्वाच्या बातम्या-

बिग ब्रेकिंग! रोहित आणि ईशांत शर्मा पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यातून बाहेर?

‘ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणे आव्हानात्मक, स्वतःशीच सामना करण्यासाठी तयार’, भारतीय घातक वेगवान गोलंदाजाची प्रतिक्रिया

टीम इंडियाचे ४ माजी खेळाडू श्रीलंकेतील LPL स्पर्धेत गाजवणार मैदान; ‘या’ संघात समावेश

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---