यावर्षी आयपीएलचा नवीन हंगाम युएईमध्ये खेळला जाईल. या १३ व्या हंगामाला १९ सप्टेंबर २०२० रोजी सुरुवात होईल. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आयपीएलला भारताबाहेर खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेळी आयपीएलमध्ये भारतीय प्रेक्षक मैदानावर दिसणार नाहीत तसेच यूएईचे प्रेक्षकही स्टेडियममध्ये दिसणार नाहीत. प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद फक्त टीव्हीवर घेऊ शकतात.
भारतीय आणि परदेशी खेळाडू आयपीएलमध्ये आपला जलवा दाखवतील. या स्पर्धेत काही भावांच्या जोड्याही आयपीएलमध्येही खेळतात. या लेखातही आयपीएलमध्ये खेळलेल्या भारताच्या ३ भावांच्या जोड्यांचा उल्लेख आहे.
आयपीएलमध्ये खेळलेल्या ३ भारतीय भावांच्या जोडी
युसुफ पठाण आणि इरफान पठाण
हे दोन्ही भाऊ आयपीएलच्या सुरुवातीपासूनच वेगवेगळ्या संघात खेळत होते. युसुफ पठाण प्रथम राजस्थान रॉयल्सकडून खेळला. त्यानंतर तो कोची टस्कर्स केरला आणि सनरायझर्स हैदराबादमधून आयपीएलमध्येही खेळला. तो २००८ ते २०१९ या काळात आयपीएलमध्ये खेळला. त्याचा भाऊ इरफान पठाण किंग्ज इलेव्हन पंजाब, दिल्ली कॅपिटल, गुजरात लायन्स, राइजिंग पुणे सुपरजायंट्स, सनरायझर्स हैदराबाद, चेन्नई सुपरकिंग्स इत्यादी संघांसाठी आयपीएलमध्ये खेळला. त्याने २००८ ते २०१७ या काळात आयपीएलमध्ये क्रिकेट खेळला होता. हे दोन्ही भाऊ भारतीय संघाकडूनही खेळले होते.
कृणाल पंड्या आणि हार्दिक पांड्या
कृणाल पांड्याने २०१६ मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्यास सुरुवात केली. तो चार वर्षांपासून या संघाशी संबंधित आहे. हार्दिक पांड्या त्याच्या एक वर्ष अगोदर २०१५ मध्ये संघात सामील झाला होता. दोन भावांची जोडी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून जबरदस्त कामगिरी करत आहे. दोन्ही खेळाडूंची आयपीएलच्या माध्यमातून भारतीय संघातही निवड झाली आहे.
दीपक चाहर आणि राहुल चाहर
दीपक चाहरने आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात २०१६ मध्ये केली होती. तो रायझिंग पुणे सुपरजायंट्स, राजस्थान रॉयल्स कडून खेळाला आहे आणि आता तो चेन्नई सुपरकिंग्जचा एक भाग आहे. त्याचा भाऊ राहुल चाहर सध्या मुंबई इंडियन्सचा भाग आहे. राहुल चाहरने आयपीएलमध्ये २०१७ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. दोन्ही भाऊ आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी करत आहेत.
ट्रेंडिंग लेख –
आयपीएल २०२० मध्ये खेळणाऱ्या सर्व संघातील सर्वात महागडे खेळाडू, पहा किंमत
आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार मिळवलेले ३ खेळाडू; एकाही भारतीयाचा मात्र समावेश नाही
आयपीएलचे सितारे: कृणाल पंड्या, रवींद्र जडेजा यांना टक्कर देणारा २० वर्षीय अभिषेक शर्मा
महत्त्वाच्या बातम्या –
बीसीसीआयने माजी दिग्गज खेळाडूला दिला धक्का; आयपीएलच्या कॉमेंट्री पॅनेलमध्ये दिले नाही स्थान
या खेळाडूंच्या जर्सीवर दारूची जाहिरात पाहून पाकिस्तानी क्रिकेट फॅन्स भडकले
जगभरातील सर्वच कसोटी सामन्यात एकाच चेंडूचा वापर करावा; पहा कुणी केली मागणी