जगातील सर्व क्रिकेटप्रेमी देशांनी टी-२० लीग सुरु केली आहे. जेव्हा टी-२० स्वरूप क्रिकेटमध्ये प्रथम दाखल करण्यात आले तेव्हा भारत आणि भारतीय खेळाडू ते खेळण्याच्या बाजूने नव्हते. भारतीय संघ बराच काळ कोणत्याही द्विपक्षीय मालिकेत टी-२० क्रिकेट खेळला नाही, पण जेव्हा आयसीसीने टी-२० विश्वचषक सुरू केला तेव्हा भारतीय खेळाडूंना ही स्पर्धा खेळावी लागली.
भारताने केवळ टी-२० विश्वचषक फक्त खेळला नाही तर पहिले विजेतेपदही जिंकले. त्यामुळे आयपीएल भारतातमध्ये सुरु झाले, या खेरीज भारताला जगातील सर्वात बलाढ्य आणि विश्वविजेता कर्णधार धोनी मिळाला. मात्र टी-२० क्रिकेट सुरू झाले तेव्हा काही भारतीय खेळाडू त्यासाठी पूर्णपणे तयार नव्हते. म्हणून त्यांनी तरुण खेळाडूंना संधी मिळावी म्हणून आंतरराष्ट्रीय टी-२० न खेळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हे खेळाडू आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत केवळ १ टी२० सामना खेळले.
या लेखात अशाच ३ भारतीय खेळाडूंबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकच आंतरराष्ट्रीय टी२० सामना खेळला.
३. राहुल द्रविड (Rahul Dravid)
‘द वॉल’ नावाने लोकप्रिय असणाऱ्या राहुल द्रविडचे या यादीत नाव आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडसुद्धा देशासाठी फक्त एक टी-२० सामना खेळू शकला. २०११ मध्ये राहुल द्रविडने इंग्लंडविरुद्ध हा एकमेव टी-२० सामना खेळला होता.
इंग्लंड आणि भारत यांच्यातील हा सामना मँचेस्टरच्या मैदानावर खेळला गेला आणि या सामन्यात राहुल द्रविडने अवघ्या २१ चेंडूत ३१ धावांची जोरदार खेळी केली. या खेळीत राहुल द्रविडनेही समित पटेलच्या एका षटकात सलग तीन षटकार लगावले होते.
राहुल द्रविडचा हा पहिला आणि अंतिम टी-२० सामना होता, हा सामना सुरू होण्यापूर्वी राहुल द्रविडने मर्यादित षटकांच्या सामन्यातून निवृत्तीची घोषणा केली होती.
२. मुरली कार्तिक (Murali Karthik)
भारताचा स्टार फिरकीपटू मुरली कार्तिकचेही नाव या यादीत समाविष्ट आहे. मुरली कार्तिकचा पहिला टी-२० हा त्याच्या कारकिर्दीचा शेवटचा टी-20 असल्याचेही सिद्ध झाले. २००७ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कार्तिकने एकमेव टी-२० सामना खेळला होता, त्यामध्ये त्याने ४ षटके टाकताना २७ धावा दिल्या पण त्याला एकही विकेट मिळाला नाही. परंतु, भारतीय संघाने हा सामना एमएस धोनीच्या नेतृत्वात ७ गडी राखून जिंकला.
१. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar)
‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरने भारताकडून सर्वाधिक वनडे सामने आणि कसोटी सामने खेळले, पण टी-२० मधील फक्त एका सामन्यात तो देशाचे प्रतिनिधित्व करू शकला, सचिनने हा सामना २००६ मध्ये भारतासाठी खेळला, हा सामना १ डिसेंबर, २००६ रोजी जोहान्सबर्गच्या मैदानावर खेळला गेला. हा भारताचाही क्रिकेट इतिहासातील पहिला टी२० सामना होता.
या सामन्यात सचिनने नेहमीप्रमाणे भारतासाठी डावाची सुरुवात केली. त्याने १२ चेंडूत १० धावांनी संथ खेळी केली. सचिनने गोलंदाजीमध्ये १ गडी बाद केला. वीरेंद्र सेहवागच्या नेतृत्वात भारताने हा सामना ६ विकेट्सने जिंकला. या सामन्यानंतर सचिनने आंतरराष्टीय टी२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
ट्रेंडिंग लेख –
आयपीएल २०२०: यंदा आयपीएलमध्ये पदार्पण करू शकतात हे ३ परदेशी खेळाडू…
टी२० विश्वचषक जिंकवलेले मात्र आयपीएलमध्ये अपयशी ठरलेले ५ क्रिकेटपटू
आयपीएलमधील कामगिरीच्या आधारे या ४ युवा खेळाडूंना टीम इंडियात मिळू शकते एंट्री
महत्त्वाच्या बातम्या –
विलियम्सनला खास बर्थडे गिफ्ट देत ‘या’ खेळाडूने केली भारतीय चाहत्याची बोलती बंद
एकेकाळी हार्दिक पंड्यामुळे चूक नसतानाही बॅन झालेला क्रिकेटर म्हणतोय, प्लीज तुझ्या मुलाला भविष्यात…