वनडे आणि टी२० सारख्या क्रिकेटच्या जलद प्रकारात खेळाडूंना चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडावा लागतो. परंतु कसोटी क्रिकेट हे ५ दिवसांचे असते. यात फलंदाजांना सहनशीलता दाखवून फलंदाजी करावी लागते आणि संघाला सामना जिंकवून द्यायचा असतो. तर गोलंदाजांनाही कित्येक षटके सलग टाकत कमीतकमी धावांत अधिकाधिक विकेट्स घेण्याचे आव्हान असते.
भारतीय क्रिकेटमध्ये अनेक दिग्गज खेळाडू होऊन गेले, ज्यांनी भारतीय कसोटी क्रिकेटचा स्तर उंचावर नेऊन ठेवला आहे. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, कपिल देव, सुनील गावसकर, व्हिव्हिएस लक्ष्मण आणि सौरव गांगुली यांसारख्या दिग्गज फलंदाजांनी कसोटी क्रिकेटमध्ये अनेक विक्रम केले आहेत. तसेच गोलंदाजांमध्ये अनिल कुंबळे, जहीर खान, हरभजन सिंग आणि आर अश्विन यांसारख्या गोलंदाजांनी कसोटी क्रिकेटमध्ये अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत.
अशातच भारतीय संघात असेही काही खेळाडू आहेत, जे गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्या कसोटी पुनरागमनाच्या प्रतिक्षेत आहेत. परंतु इतर प्रतिभाशाली खेळाडूंचा सध्या संघात भरणा असल्याने त्यांच्या पुनरागमनाच्या शक्यता फार कमी आहेत. अशात त्यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन फक्त मर्यादित षटकांच्या क्रिकेटकडे लक्ष केंद्रित करायला हवं. त्याच खेळाडूंचा आम्ही येथे आढावा घेतला आहे.
१) दिनेश कार्तिक : एमएस धोनी संघात असताना, दिनेश कार्तिकला संघात खेळण्यासाठी खूप कमी संधी मिळाली. निदाहास चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत शेवटच्या चेंडूवर षटकार मारणाऱ्या दिनेश कार्तिकला २०१८ च्या इंग्लंड दौऱ्यावर पहिल्या २ कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती. परंतु त्याला साजेशी कामगिरी करता आली नाही. यांनतर रिषभ पंतला संघात संधी मिळाली आणि त्याने संधीचे सोने करत भारतीय संघाला अनेक विजय मिळवून दिले आहेत. त्यामुळे दिनेशला पुन्हा कसोटी संघात संधी मिळणे अवघड आहे.
२) शिखर धवन : भारतीय संघात ‘गब्बर’ म्हणून ओळखला जाणारा फलंदाज शिखर धवन याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध शतक झळकावले होते. त्यांनतर त्याने अनेक सामन्यांमध्ये भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. परंतु गेल्या काही वर्षांपासून तो भारतीय कसोटी संघातून बाहेर आहे. त्याने २०१८ मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला होता आणि ती मलिका भारतीय संघाने गमावली होती. त्या मालिकेच्या आठ डावात त्याला एकही अर्धशतक झळकावण्यात यश आले नव्हते. त्यांनतर त्याला संघाबाहेर करण्यात आले होते. आता संघात रोहित शर्मा आणि शुबमन गिल हे भारतीय संघाच्या सलामीची भूमिका योग्यरीत्या पार पाडत असल्यामुळे शिखर धवनचे संघात पुनरागमन होणे कठीण दिसून येत आहे.
३) मुरली विजय : २००८ मध्ये भारतीय कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या मुरली विजयने भारतीय संघाच्या अनेक विजयात मोलाची भूमिका बजावली आहे. त्याने २०१८ मध्ये ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर त्याला संघात खेळायची संधी मिळाली नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पहिल्या २ कसोटी सामन्यात धावा न करता आलेल्या मुरली विजयला नंतर कसोटी सामना खेळायची संधी मिळाली नाही. अशातच सध्या भारतीय संघात रोहित शर्मा, शुबमन गिल, केएल राहुल आणि मयंक अगरवाल यांसारखे फलंदाज आहेत. यामुळे मुरली विजयकडे निवृत्ती घेण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
एकाच दिवशी पदार्पण केलेल्या जोड्या, एकाने केले पुढे मोठे नाव तर दुसरा राहिला खूपच मागे
व्वा भावा व्वा..! अवघ्या ४२ चेंडूत झळकावलं शतक, विराट आणि सूर्यकुमारला सोडलं पिछाडीवर






टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये रंगणार दिग्गजांची मैफल! विश्वचषकासाठी ‘स्टार’ कॉमेंट्री पॅनेलची घोषणा