आगामी टी२० विश्वचषक १७ ऑक्टोंबरला सुरू होणार आहे. विश्वचषकासाठी भारताच्या १५ सदस्यीय संघाची ८ सप्टेंबरला घोषणा करण्यात आली. संघात अनेक अनपेक्षित नावे पाहायला मिळाली आहेत. विश्वचषकापूर्वी युएईत आयपीएल २०२१ चे राहिलेले सामने होणार आहे. त्यामुळे आयपीएलचे चालू हंगामातील उर्वरित सामने १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये खेळले जाणार असून या सामन्यात केलेल्या चांगल्या प्रदर्शनावरून टी२० विश्वचषकासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हमध्ये कोणाला संधी मिळेल? हे ठरणार, यात शंका नाही. तसेच ज्या खेळाडूंची विश्वचषकासाठी निवड झाली नाही. तेही आयपीएलमध्ये चांगले प्रदर्शन करून निवडकर्त्यांना त्यांची चूक दाखवून देण्याचा प्रयत्न करतील.
टी२० विश्वचषकासाठी सर्व देशांनी त्यांच्या संघाची घोषणा केली आहे आणि १० ऑक्टेंबरपर्यंत ते संघात बदल करू शकतात. खेळाडूंच्या आयपीएलमधील चांगल्या प्रदर्शनावरूनच टी२० विश्वचषकासाठी त्यांची निवड केली गेली आहे. यामध्ये इशान किशन, सूर्यकुमार यादव, राहुल चाहर आणि वरुण चक्रवर्ती या खेळाडूंचा समावेश आहे. विश्वचषकासाठी निवडलेल्या संघात काही खेळाडू असेदेखील आहेत, ज्यांनी यावर्षी आयपीएलमध्ये चांगले प्रदर्शन केले नाही, तरीही त्यांना संधी मिळाली आहे. या लेखात आपण अशाच तीन भारतीय खेळाडूंचा उल्लेख करणार आहोत ज्यांनी आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यात चांगले प्रदर्शन केले नाही. तरीदेखील त्यांची टी २० विश्वचषकासाठी निवड केली गेली आहे.
३. भुवनेश्वर कुमार
आयपीएल २०२१ च्या पहिल्या पर्वात सनरायजर्स हैदराबाद संघाने खूपच खराब प्रदर्शन केले असून याचे एक कारण म्हणजे, संघाचा प्रमुख गोलंदाज भुवनेश्वर कुमारचा खराब फार्म. तो या हंगामाच्या पहिल्या टप्प्यात काही चांगली कामगिरी करू शकला नाही. त्याने दुखापतीमुळे काही सामन्यांमधून माघारही घेतली होती. त्याने खेळलेल्या एकूण ५ सामन्यांमध्ये ९ च्या इकाॅनमी रेटने केवळ ३ विकेट्स घेतल्या आहेत.
असे असले तरीही, निवडकर्त्यांनी त्याच्या खराब प्रदर्शनाकडे दुर्लक्ष करत त्याचा अनुभव आणि योग्यता पाहून त्याला टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघात सामील खेले गेले आहे.
२. इशान किशन
आयपीएलपूर्वी इंग्लंडसोबत खेळल्या गेलेल्या टी२० मालिकेत चांगल्या प्रदर्शनामुळे इशान किशनला आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्यानेही या संधीचा योग्या फायदा घेत पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक झळकावले होते. असे असले तरी त्याला आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यात मुंबई इंडियन्ससाठी काही खास कामगिरी करता आली नव्हती. त्याला या हंगामात धावा करण्यासाठी संघर्ष करावा लागला होता. यापूर्वी आयपीएल २०२० मध्ये मुंबई इंडियन्ससाठी त्याने महत्वाची भूमिका पार पाडली होती आणि संघ ट्राॅफी जिंकला होता. मात्र यावर्षीच्या हंगामात तो ५ सामने खेळला असून अवघ्या ७३ धावा करू शकला आहे आणि याच कारणामुळे त्याला संघाच्या प्लेइंग इलेव्हनमधूनही वगळण्यात आले होते.
पण आयपीएल २०२१च्या पहिल्या टप्प्यातील खराब प्रदर्शनानंतरही त्याला टी २० विश्वचषकासाठी भारतीय संघात संधी दिली गेली आहे. तो संघासाठी कितव्याही स्थानावर फलंदाजी करू शकतो आणि यष्टीरक्षकाची भूमिकाही पाह पाडू शकतो, यामुळेच त्याला संधीत संधी मिळाली आहे.
१. हार्दिक पांड्या
मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या यावर्षी आयपीएलच्या पहिल्या पर्वात खराब फार्ममध्ये दिसला. तो मागच्या काही काळापासून त्याच्या कंबरेच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. त्याने या हंगामात खेळलेल्या ७ सामन्यात ११८.१८ च्या स्ट्राइक रेटने केवळ ५२ धावा केल्या आहेत आणि गोलंदाजीही केलेली नाही. असे असले तरी टी२० विश्वचषकामध्ये निवडकर्त्यांनी पांड्याला फिनिशरच्या भूमिकेत संघात संधी दिली आहे. तो दुखापतीतून सावरत असून विश्वचषकामध्ये गोलंदाजी करतानाही दिसू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
सर्वात भीषण आतंकवादी हल्ल्यात मरण पावलेला एकमेव क्रिकेटपटू, लाराविरूद्ध केलेले नेतृत्व
नेपाळच्या गोलंदाजापुढे विरोधी संघाची फलंदाजी फळी खिळखिळी, ५.१ षटकात काढल्या ६ विकेट्स
आयपीएल तोंडावर असताना उसळला नवा वाद, ‘या’ कारणामुळे फ्रँचायझींचे बीसीसीआयला पत्र