भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies) या दोन्ही संघांमध्ये येत्या ६ फेब्रुवारी पासून ३ वनडे सामन्यांची मालिका रंगणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या पराभवानंतर भारतीय संघ पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने बुधवारी (२६ जानेवारी) १८ सदस्यीय खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. या संघात ३ असे खेळाडू आहेत, जे पहिल्यांदाच भारतीय संघासाठी वनडे क्रिकेट खेळताना दिसणार आहेत. कोण आहेत ते खेळाडू चला पाहूया.
१) रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) :
रवी बिश्नोईने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आणि आयपीएल स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली आहे. ही कामगिरी पाहता त्याची वेस्ट इंडिज संघाविरुद्ध होणाऱ्या वनडे आणि टी२० मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे. तो गेल्या काही वर्षांपासून आयपीएल स्पर्धेत पंजाब किंग्ज संघाचे प्रतिनिधित्व करतोय. या संघासाठी त्याने अनेकदा मोलाची भूमिका देखील पार पाडली आहे. तसेच आगामी हंगामासाठी पंजाब किंग्ज संघाने त्याला रिटेन केले आहे. त्याच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने आतापर्यंत १७ लिस्ट ए सामन्यात २४ गडी बाद केले आहेत, तर ४२ टी२० सामन्यात ४९ गडी बाद केले आहेत.
२) आवेश खान (Avesh Khan) :
वेगवान गोलंदाज आवेश खानची देखील वेस्ट इंडिज विरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे. आवेश खानने आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. या संघाला विजय मिळवून देण्यात त्याने मोलाची भूमिका बजावली होती. तसेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये देखील त्याने लक्षवेधी कामगिरी केली होती. त्याने २७ प्रथम श्रेणी सामन्यांत १०० गडी बाद केले आहेत. लिस्ट ए सामन्यांत १७ आणि टी२० क्रिकेटमध्ये ६५ गडी बाद केले आहेत.
३) दीपक हुड्डा (Deepak Hooda) :
तसेच दीपक हुड्डाची देखील वेस्ट इंडिज विरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे. दीपक हुड्डाने देखील आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या दीपक हुड्डाने ७४ लिस्ट ए सामन्यांत २२५७ धावा केल्या आहेत, तर ४६ प्रथम श्रेणी सामन्यात २९०८ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ९ शतक झळकावले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
“असे केल्याने विराटची फलंदाजी बहरेल”; दिग्गजाने सुचविला उपाय
भारताविरुद्धच्या मालिकेआधी श्रीलंकेला धक्का! महत्वाच्या अष्टपैलूची तडकाफडकी निवृत्ती
हे नक्की पाहा: