क्रिकेट प्रकार कोणताही असो कसोटी, वनडे किंवा टी20 यामध्ये कर्णधाराची भूमिका खूप महत्त्वाची असते. असेच टी20 लीग आयपीएलबाबतही आहे. आयपीएलमध्ये असे काही कर्णधार आहेत ज्यांनी आपल्या नेतृत्वाखाली संघाचा चेहरा मोहरा बदलून ठेवला आहे. परंतु असे काही कर्णधार आहेत जे आयपीएलमध्ये पूर्णपणे अपयशी ठरले आहेत.
आयपीएल इतिहासात रोहित शर्मा व एमएस धोनी हे सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहेत. रोहित शर्माने 2013 पासून मुंबई इंडियन्स संघाचे कर्णधारपद स्वीकारले आहे. त्याने 7 हंगामात संघाचे नेतृत्त्व करताना 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 या 5 हंगामात संघाला विजेतेपद मिळवून दिले आहे.
धोनीनेदेखील आपल्या संघाला 2010, 2011 आणि 2018 या 3 हंगामात आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले आहेत. याव्यतिरिक्त गौतम गंभीरने कोलकाता नाईट रायडर्स संघाला 2012 आणि 2014 या 2 हंगामात आयपीएलचे विजेतेपद जिंकून दिले आहे. पण काही कर्णधारांना मात्र आपल्या संघाला आयपीएलचे विजेतेपद जिंकून देण्यात अपयश आले आहे.
आयपीएलमध्ये अपयशी ठरलेले कर्णधार
1. विराट कोहली
भारतीय संघाचा यशस्वी कर्णधार विराट कोहली हा आयपीएलमधील सर्वात अयशस्वी कर्णधार ठरला आहे. रोहित शर्मा प्रमाणेच 2013 पासूनच त्याला कर्णधारपद सोपविण्यात आले होते. गेल्या 7 वर्षांत त्याने एकदाही संघाला विजेतेपद मिळवून दिले नाही, तर दोन वेळा त्याचा संघ आठव्या स्थानी राहिला आहे. 2020 च्या हंगामात त्याने संघाला ‘प्ले ऑफ’पर्यंत नेले खरे, पण त्याच्या संघाच्या पदरी सलग 13 वर्षे निराशा पडली.
2. आर अश्विन
राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू आर अश्विननेदेखील आयपीएलमध्ये 2 हंगामात कर्णधारपद भूषवले आहे. 2018 साली कर्णधारपद मिळाल्यानंतर त्याने सुरुवात चांगली केली. मात्र, नंतर तो अपयशी ठरत गेला. पुढे 2019 मध्ये 14 पैकी 6 च सामने तो जिंकून देऊ शकला. त्यानंतर पंजाबने त्याला संघातून रिलीझ केले.
3. दिनेश कार्तिक
दिल्लीच्या संघातून कोलकाता नाईट रायडर्समध्ये आलेल्या दिनेश कार्तिकला 2018 मध्ये गौतम गंभीरच्या जागी कर्णधार बनविण्यात आले. 2018 साली त्याने संघाला ‘प्ले ऑफ’पर्यंत पोहोचवले होते. 2019 साली संघ पाचव्या स्थानी पोहोचला होता. आयपीएल 2020 मध्ये दिनेश कार्तिकने अर्ध्या हंगामातून कर्णधारपद सोडले. त्यालाही आपल्या संघाला आयपीएलचे विजेतेपद जिंकून देता आले नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
रोहित शर्मा जाऊ शकतो ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर; ‘या’ खेळाडूऐवजी मिळू शकते संधी
…आणि मनीष पांडेने केली विराट कोहलीची बोलती बंद, पाहा व्हिडिओ
बापरे! धोनीची एक धाव सीएसकेला पडली ७.५ लाखांना, तर १ कोटी ४१ लाखांना ‘या’ गोलंदाजाची विकेट
ट्रेंडिंग लेख-
भारतीय फलंदाजांना नडणाऱ्या ब्रेट लीबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?
‘या’ पाच खेळाडूंची आरसीबीतून होऊ शकते हकालपट्टी, एक नाव आहे धक्कादायक
RCB च्या कर्णधारपदी कुणाची लागू शकते वर्णी? ही ३ नावे चर्चेत