---Advertisement---

‘या’ भारतीय खेळाडूंच्या नावे आहेत आश्चर्यकारक विश्वविक्रम

On: शनिवार, जानेवारी 23, 2021 10:26 PM
---Advertisement---

क्रिकेटजगतातील सर्वच खेळप्रकारात भारतीय खेळाडूंनी नेहमी चमकदार कामगिरी करत अनेक विश्वविक्रम आपल्या नावी जमा केले आहेत. पुर्वीपासूनच भारतीय संघात अनेक दिग्गज खेळाडू झाले आहेत, सुनिल गावसकर पासून तर सचिन तेंडुलकर आणि आता कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मापर्यंत अशा अनेक खेळाडूंनी क्रिकेट जगतावर आपला ठसा उमटवला आहे.

असेही अनेक भारतीय गोलंदाज आहेत ज्यांनी आपल्या चेंडूवर अनेक महान फलंदाजांना तंबूत पाठवलं असून त्यात जहीर खान, अनिल कुंबळे, जवागल श्रीनाथ आणि हरभजन सिंग अशी अनेक नावे आहेत. आपण क्रिकेट विश्वात नेहमी मुथय्या मुरलीधरन, शेन वॉर्न, ग्लेन मँकग्रा, ब्रायन लारा, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि जॅक कॅलिस अशा अनेक दिग्गजांना विश्वविक्रम आपल्या नावावर करताना बघितलं आहे. यातून असे काही खेळाडू आहेत की ज्यांनी काही आश्चर्यचकीत करणारे विश्वविक्रम आपल्या नावावर केले आहे. आजच्या या लेखात आपण अशाच तीन खेळाडूंच्या आश्चर्यकारक विश्वविक्रमांचा आढावा घेणार आहोत.

1) स्टुअर्ट बिन्नी –

ढाकामध्ये बांगलादेशविरूद्ध बिन्नीने एक आश्चर्यकारक विक्रम आपल्या नावावर केला होता. बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात त्याने 4 धावा देऊन 6 विकेट घेत यजमान बांगलादेशला 58 धावांवर बाद केले. आतापर्यंत कोणत्याही भारतीय गोलंदाजाने अशी कामगिरी बजावलेली नाही. अनिल कुंबळे याच्याकडे 12 धावांत 6 बळी मिळवण्याचा विक्रम होता पण बिन्नीने हा विक्रम मोडला आहे.

2) अजित आगरकर –

भारतीय संघात प्रामुख्याने गोलंदाज म्हणून खेळणार्‍या अजित आगरकरने फलंदाजीतील वेगवान अर्धशतकाचा विक्रम नोंदविला. 2000 साली राजकोटमध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात त्याने 8 व्या क्रमांकावर खेळायला येऊन 21 व्या चेंडूत अर्धशतक झळकावत हा विक्रम नोंदवला. या खेळीत त्याने 25 चेंडूत 67 धावा केल्या.

3) निलेश कुलकर्णी –

भारतीय गोलंदाज निलेश कुलकर्णीने आपल्या कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या पहिल्याच सामन्यात पहिल्याच चेंडूवर आपला पहिला बळी मिळवला होता. श्रीलंकेतील कोलंबोत 1997 मध्ये झालेल्या या कसोटी सामन्यात निलेश कुलकर्णीने कसोटी सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर मार्व्हन अटापट्टूला तंबूत पाठवले. नयन मोंगियाने त्याला विकेटच्या मागे झेलबाद केले. या डावात फलंदाज अटापट्टूने 26 धावा केल्या होत्या. विशेष म्हणजे या सामन्यात श्रीलंकेने 952 धावांचा विशाल डोंगर उभारला होता.

महत्वाच्या बातम्या:

भारतीय खेळाडूंच्या तुलनेत ऑस्ट्रेलियन युवा खेळाडू अजूनही प्राथमिक शाळेतच, माजी दिग्गजाचा घरचा आहेर

ब्रिस्बेन कसोटीत वॉशिंग्टन सुंदरला खेळवण्याचा निर्णय धाडसी होता, पण, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांची प्रतिक्रिया

BAN vs WI : सलग दुसऱ्या विजयासह बांग्लादेशचा मालिकाविजय, वनडे विश्वचषकाच्या सुपरलीग मध्ये या स्थानी घेतली झेप

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---