भारतीय संघाने १९७४ ला वनडे क्रिकेटमध्ये प्रवेश केला आणि केवळ एक दशकानंतर, इतर मोठ्या संघाना आपल्या आगमनाची जाणीव करून दिली. फलंदाजी आणि गोलंदाजीतील सांघिक कामगिरीमुळेच भारताने १९८३ मध्ये विश्वचषक जिंकला. त्यानंतर २०११ मध्ये भारताने पुन्हा वनडे क्रिकेटचा विश्वचषक जिंकत एक इतिहास रचला. यावेळीही संघाच्या सांघिक कामगिरीमुळे हे शक्य झाले.
भारतीय संघात असे अनुभवी गोलंदाज आहेत ज्यांनी आपल्या जबरदस्त कामगिरीने वेळोवेळी संघाच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. जवागल श्रीनाथ, झहीर खान आणि अजित आगरकर या गोलंदाजांनी आपल्या गोलंदाजीच्या जोरावर वनडे क्रिकेटमधील अनेक सामने जिंकले आहेत.
वनडे क्रिकेट म्हटलं की सर्वांचे लक्ष वेगवान गोलंदाजांकडे जाते.
भारतीय संघासाठी वनडे क्रिकेटमध्येही अनेक फिरकीपटूंनी गोलंदाजी केली आहे. त्यात त्यांनी संघाला एकहाती विजय देखील मिळवुन दिले आहेत.
वनडे क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या ३ फिरकीपटूंबद्दल आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
वनडे क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे ३ सर्वोत्कृष्ट फिरकी गोलंदाज
३. रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja)
वनडे कारकीर्दीत रवींद्र जडेजाने एकूण १६५ सामने खेळले आहेत. या सामन्यांत रवींद्र जडेजाने १६१ डावात १८७ बळी घेतले आहेत. त्याची सर्वोत्तम कामगिरी ३६धावांत ५ विकेट्स अशी आहे. सर्वाधिक विकेट घेणार्या भारतीय फिरकीपटूंमध्ये जडेजा तिसर्या क्रमांकावर आहे.
२. हरभजन सिंग (Harbhajan Singh)
हरभजन सिंगने १९९८ मध्ये भारताकडून पदार्पण केले होते. सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय फिरकी गोलंदाजांच्या यादीत हरभजन सिंगचे नाव दुसर्या क्रमांकावर आहे. २०१५ मध्ये शेवटचा सामना खेळलेला हरभजन अद्याप निवृत्त झाला नाही. त्याने २३४ सामन्यांच्या २२५ डावात २६५ विकेट्स घेतल्या आहेत. ३१ धावा देऊन ५ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. तीन वेळा त्याने ५ विकेट्स घेतल्या आहेत.
१. अनिल कुंबळे (Anil Kumble)
भारतीय संघासाठी कसोटीप्रमाणेच वनडेतही अनिल कुंबळे सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. १९९० ते २००७ दरम्यान त्याने एकूण २६९ वनडे सामने खेळले. या वनडे सामन्यांत अनिल कुंबळेने २६३ डावात ३३४ बळी घेतले. १२ धावांत ६ विकेट्स ही त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी होती आणि त्याने दोन वेळा ५ विकेट्सही घेतले आहेत.
वाचनीय लेख –
५ दिग्गज खेळाडू ज्यांनी कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळला वर्ल्डकप फायनलमध्ये
भारतीय प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालेले ३ ऑस्ट्रेलियन क्रिकेटर
विक्रम जरी मोडण्यासाठी असले तरी हे ३ विक्रम मोडणे केवळ अशक्य