भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात २७ नोव्हेंबरपासून वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. टी-२० मालिकेतील पहिला सामना ४ डिसेंबर रोजी कॅनबेरा येथे खेळला जाईल. या मालिकेचा शेवट ८ डिसेंबरला सिडनी येथे होणार आहे. दोन्ही संघात तगड्या खेळाडूंचा भरणा आहे.
त्यामुळे क्रिकेटप्रेमींना रोमांचक मालिका पाहायला मिळणार अशी अपेक्षा आहे. भारतीय संघाकडे या मालिकेसाठी शानदार खेळाडू आहेत. त्यापैकी बरेच खेळाडू आयपीएलमध्ये फॉर्ममध्ये पाहायला मिळाले. भारताकडे शिखर, विराट, राहुल आणि हार्दिक यांसारखे तगडे खेळाडू आहेत. ज्यांच्यावर भारतीय संघाची मदार असेल. यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय फलंदाजांनी चांगली कामगिरी करत भरपूर प्रमाणात धावा केल्यात.
या लेखाच्या माध्यमातून आपण ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या ३ भारतीय फलंदाजांबद्दल जाणून घेणार आहोत.
३. एमएस धोनी (३१३ धावा)
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी हा टी-२० मध्ये तसा दिसून येत नाही, जसा तो आयपीएलमध्ये फटकेबाजी करताना दिसतो. तरी सुद्धा ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावा काढणार्या भारतीय फलंदाजांमध्ये तो तिसर्या क्रमांकावर आहे. धोनीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १७ टी-२० सामन्यात ३९.१२ च्या सरासरीने ३१३ धावा केल्यात. यामध्ये त्याची सर्वाधिक धावसंख्या नाबाद ४८ आहे.
२. रोहित शर्मा (३१८ धावा)
‘हिटमॅन’ या नावाने प्रसिद्ध असणारा भारतीय सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा, हा या दौऱ्यातील टी-२० मालिकेसाठी उपलब्ध नाही. मात्र रोहितच्या उत्कृष्ट प्रदर्शनामुळे त्याची उणीव नक्कीच भारतीय संघाला जाणवेल. रोहित शर्माला आयपीएल दरम्यान झालेल्या दुखापतीमुळे, या मालिकेसाठी त्याची निवड झाली नाही. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १९ टी-२० सामन्यातील १६ डावात ३१८ धावा केल्या आहेत. त्यामुळे तो सर्वाधिक धावा करणार्या भारतीयांमध्ये दुसर्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहितची सर्वाधिक धावसंख्या ही नाबाद ७९ आहे.
१. विराट कोहली (५८४ धावा)
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने टी-२० क्रिकेट प्रकारात ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार कामगिरी केली आहे. तो भारताचा सर्वाधिक धावा करणार पहिला फलंदाज आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १६ टी-२० सामन्यात ५८४ धावा केल्यात. या दरम्यान विराटने ६ अर्धशतके झळकावली आहेत. त्याचबरोबर त्याची सर्वाधिक धावसंख्या नाबाद ९० धावा आहे.
ट्रेंडिंग लेख-
ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकाच टी२० सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकणारे ३ भारतीय धुरंदर
ऑस्ट्रेलियन भूमीत वनडेमध्ये सर्वाधिक चेंडूचा सामना करणारे ३ भारतीय फलंदाज
भारतीय संघातील ५ खेळाडू ज्यांनी ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटीत केली आहे दमदार कामगिरी
महत्त्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तान संघाचे ६ खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह
रहाणेने मागितली शेजाऱ्यांची माफी; धवन म्हणाला, ‘तू तुझ्या मुलीबरोबर…’
आईने मजुरी करून वाढवले; आज भारतीय संघाच्या जर्सीत मिरवतोय ‘हा’ खेळाडू