---Advertisement---

आईने मजुरी करून वाढवले; आज भारतीय संघाच्या जर्सीत मिरवतोय ‘हा’ खेळाडू

On: गुरूवार, नोव्हेंबर 26, 2020 9:58 AM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवण्याचे प्रत्येक युवा क्रिकेटपटूचे स्वप्न असते. त्यासाठी ते कठोर परिश्रमही घेतात. हलाकीची परिस्थिती असतानाही फक्त मेहनतीच्या बळावर काही खेळाडूंनी भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवलं आहे. याचेच एक ज्वलंत उदाहरण म्हणजे एक भारतीय युवा वेगवान गोलंदाज. मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर आगामी ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी त्याने भारतीय संघात स्थान मिळवलं आहे.

टी नटराजनची भारतीय संघात झाली निवड

आयपीएलच्या 13 व्या हंगामात सनरायझर्स हैदराबादकडून खेळणारा डावखुरा वेगवान गोलंदाज टी नटराजनने आपल्या कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केले होते. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या टी20 मालिकेसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली आहे. तो भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे.

नटराजनने भारतीय संघाची जर्सी घालून फोटो केला शेअर

डावखुरा वेगवान गोलंदाज टी नटराजनने बुधवारी (25 नोव्हेंबर) आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तो भारतीय संघाच्या जर्सीमध्ये दिसत आहे. त्याने भारतीय संघाची नवीन जर्सी परिधान केली आहे. नटराजनने फोटो शेअर करताना लिहिले की, “ही जर्सी परिधान करणे म्हणजे एक खास अनुभव आहे.”

नटराजनची आई होती मजूर

टी नटराजनने बालपण अत्यंत गरीबीत घालवले आहे. त्याचा जन्म तमिळनाडूतील चिन्नापामट्टी गावात झाला होता. त्याची आई मजूर होती. नटराजन टेनिस चेंडूने क्रिकेट खेळायचा. क्रिकेट प्रशिक्षक जयप्रकाश त्याच्या गोलंदाजीमुळे प्रभावित झाले आणि त्याला तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर नटराजनचे नशिबच बदलले.

पंजाबने 3 कोटी रुपयात घेतले विकत

नटराजनला किंग्ज इलेव्हन पंजाबने 2017 मध्ये 3 कोटी रुपयात विकत घेतले होते. पुढच्या वर्षी पंजाबने त्याला रिटेन केले नाही. त्यामुळे सनरायझर्स हैदराबादने या वेगवान गोलंदाजाला 40 लाख रुपयात विकत घेतले. आयपीएल 2020 मध्ये नटराजनने हैदराबादला प्ले- ऑफपर्यंत पोहोचवण्यात मोलाची कामगिरी केली.

नटराजनची आयपीएलमधील कामगिरी

टी नटराजनने आयपीएल 2020 मध्ये शानदार कामगिरी करत 16 सामन्यांत 16 गडी बाद केले. त्याचा इकॉनॉमी रेट 8.02 होता. अखेरच्या षटकांत त्याने यॉर्कर चेंडू फेकत धोनीसारख्या दिग्गज फलंदाजांनाही घाम फोडला.

महत्त्वाच्या बातम्या-

दिग्गज भारतीय खेळाडूकडून टी नटराजनची प्रशंसा; त्यानेही दिले मन जिंकणारे प्रत्युत्तर

AUSvsIND : फलंदाजांच्या दांड्या गुल करणाऱ्या टी नटराजनचा नेटमध्ये कसून सराव; BCCI ने शेअर केला व्हिडिओ

सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज टी नटराजन का आहे इतका खास?

ट्रेंडिंग लेख-

भारतीय संघातील ५ खेळाडू ज्यांनी ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटीत केली आहे दमदार कामगिरी

वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना ‘सळो की पळो’ करुन सोडणारे ३ भारतीय फलंदाज

कसोटीतील हे तीन दिग्गज कधीच दिसणार नाहीत भारताच्या निळ्या जर्सीत?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---