भारतीय क्रिकेट इतिहासात एकापेक्षा एक कर्णधार होऊन गेले आहेत. काही कर्णधारांनी त्यांची जबाबदारी इतक्या उत्कृष्ट पद्धतीने पार पाडली की, भारतीय क्रिकेटच्या इतिहासात त्यांची नावे सुवर्णाक्षराने लिहिली गेली. कपिल देव, मोहम्मद अझरुद्दीन, सौरव गांगुली, एमएस धोनी ही याची उत्तम उदाहरणे आहेत. कपिल देव यांनी त्यांच्या नेतृत्त्वाखाली १९८३ साली भारताला पहिला विश्वचषक जिंकून दिला. तर, एमएस धोनीने २००७ सालचा टी२० विश्वचषक, २०११ सालचा वनडे विश्वचषक आणि २०१३ सालची चॅम्पियन्स ट्रॉफी पटकावत भारतीय क्रिकेट संघाला नवी ओळख मिळवून दिली. सौरव गांगुली आणि मोहम्मद अझरुद्दीन यांनी भारतीय क्रिकेट संघाला कित्येक आंतरराष्ट्रीय सामने जिंकून दिले आहेत.
संघातील अधिकतर दिग्गज खेळाडूंचे स्वप्न असते की, त्यांना एकदा तरी आपल्या संघाचे नेतृत्त्व करण्याची संधी मिळावी. काही दिग्गजांचे हे स्वप्न पूर्णदेखील होते. पण, अनेकांच्या वाट्याला ही संधी येत नाही. त्यांचे कर्णधार बनण्याचे स्वप्न हे केवळ स्वप्न बनून राहते. पण, कधी योगायोगाने काही कारणामुळे संघातील एखाद्या दिग्गजाला काही सामन्यांपुरती नेतृत्त्व करण्याची संधी मिळते. त्यातही ते जर त्यांची जबाबदारी सांभाळण्यात अपयशी ठरले, तर ती संधीदेखील त्यांच्याकडून हिरावून घेतली जाते.
या लेखात, त्या ३ भारतीय दिग्गजांचा आढावा घेण्यात आला आहे, ज्यांनी केवळ एका वनडे सामन्यात भारतीय संघाची कमान सांभाळली आहे. 3 Legendary Indians Who Got Captaincy In Only 1 ODI
१. अनिल कुंबळे –
भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळे याला ‘जम्बो’ नावाने संबोधले जाते. ९०च्या शतकात आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या कुंबळेने वनडेत २७१ सामने खेळत ३३७ विकेट्स चटकावल्या आहेत. अशा या दमदार गोलंदाजाला एका वनडे सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्त्व करण्याची संधी मिळाली होती.
२५ जानेवारी २००२ला चेन्नईमधील इंग्लंडविरुद्धच्या वनडे सामन्यात कुंबळेने संघाची कमान सांभाळली होती. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड केवळ २१७ धावांवर सर्वबाद झाला होता. भारताने इंग्लंडचे आव्हान ४६.४ षटकात ६ विकेट्स गमावत पूर्ण केले होते. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने या सामन्यात ७९ चेंडूत ६८ धावांची शानदार खेळी केली होती. सचिन हा या सामन्यात सामनावीर ठरला होता. जरी, कुंबळेला फक्त एका वनडे सामन्यात कर्णधार बनण्याची संधी मिळाली असली, तरी त्याने १४ कसोटी सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्त्व केले आहे.
२. गुंडप्पा विश्वनाथ –
१९८१मध्ये गुंडप्पा विश्वनाथ यांनी भारतीय वनडे संघाचे नेतृत्त्व केले होते. मात्र, भारताला त्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. १५ फेब्रुवारी १९८१ला हॅमिल्टन येथे न्यूझीलंडविरुद्ध तो सामना खेळला गेला होता. या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत निर्धारित ५० षटकात ८ विकेट्स गमावत २१० धावा केल्या होत्या.
न्यूझीलंडच्या या लक्ष्याचा पाठलाग करण्यात विश्वनाथ यांचा भारतीय संघ मात्र अपयशी ठरला. भारतीय संघात केवळ १५३ धावांवर सर्वबाद झाला होता आणि न्यूझीलंडने ५७ धावांनी भारताला धूळ चारली होती. त्या सामन्यानंतर विश्वनाथ यांना भारतीय वनडे संघाचे नेतृत्त्व करायला मिळाले नाही.
३. सय्यद किरमानी –
भारताचे माजी यष्टीरक्षक फलंदाज सय्यद किरमानी यांनी भारताकडून ४९ वनडे सामने खेळले आहेत. दरम्यान त्यांना १७ डिसेंबर १९८३ साली वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्त्व करायला मिळाले होते. गुवाहाटी येथे पार पडलेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत निर्धारित ४४ षटकात १७८ धावा केल्या होत्या.
वेस्ट इंडिजने दिलेले आव्हान ४१.४ षटकात ४ विकेट्स गमावत पूर्ण केले होते. त्यामुळे भारताने तो सामना ६ विकेट्सने गमावला होता. त्या सामन्यानंतर किरमानी यांना भारतीय वनडे संघाचे नेतृत्त्व करण्याची संधी मिळाली नाही.
ट्रेंडिंग लेख –
या १० फलंदाजांनी कसोटी क्रिकेटमध्ये मारलेत सर्वाधिक षटकार; एका भारतीयाचाही आहे समावेश
आयपीएलमध्ये एकही षटकार मारता न आलेले 3 खेळाडू
एकही आयपीएल आरसीबी जिंकली नाही, पण आरसीबीचे असे ३ विक्रम मात्र मुंबईलाही जमले नाहीत
महत्त्वाच्या बातम्या –
सचिन, गांगुली, सेहवाग नाही तर ‘या’ भारतीय फलंदाजाविरुद्ध गोलंदाजी करताना शोएब अख्तरला यायचे टेंशन
३० शतके आणि २५० विकेट्स घेणारा ‘हा’ खेळाडू गाजवणार रणजी क्रिकेट
या दिग्गज खेळाडूची १९ वर्षीय मुलगी आहे खूपच सुंदर; सोशल मीडियावर आहेत भरपूर फॉलोवर्स